लडाख : एकीकडे चिनी नेते वास्तविक नियंत्रण रेषेवरून भारताशी शांतता व स्थिरतेचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) सीमेजवळ आपली ताकद वाढवत आहे. सॅटेलाइट फोटोंच्या माध्यमातून पीएलएची ही चाल उघडकीस आली आहे. फोटोंमध्ये दिसून येत आहे की, सीमेवर चीनच्या पीएलएचे हवाई दल काश्गर विमानतळावर तैनात आहे.
ओपन इंटेलिजेंस सोर्स Detresfa च्या सॅटेलाइट फोटोवरून हे स्पष्ट दिसत आहे की, एयरबेसवर मोक्याच्या ठिकाणी बॉम्ब आणि इतर सामुग्री तैनात आहे. लडाखपासून येथील अंतर पाहता अशी शंका व्यक्त केली जात आहे की, भारत-चीन यांच्यातील सीमेवरील तणावामुळे ही तैनात करण्यात आली आहे.
सॅटेलाइट फोटोंमध्ये असे दिसते की, या बेसवर 6 शियान एच -6 बॉम्बर आहेत. यामध्ये दोन 2 पेलोड आहेत. यामध्ये क्षेपणास्त्र असण्याची शंका आहे. याव्यतिरिक्त, येथे 12 शियान जेएच -7 लढाऊ बॉम्बर आहेत, त्यापैकी दोन पेलोड आहेत. तसेच, येथे 4 शेनयांग जे 11/16 लढाऊ विमाने आहेत. त्यांची रेंज 3530 किलोमीटर आहे. हे बॉम्बर अण्वस्त्रे घेऊन जाण्यास सक्षम आहेत. लडाखपासून या तळाचे अंतर सुमारे 600 किमी आहे, तर एच -6 ची रेंज 6000 किमी आहे. विशेष म्हणजे, चीनने एच -6 जे आणि एच -6 जी विमानांसह दक्षिण चीन समुद्रातही ड्रिल केले आहे.
या भागात आधीपासून असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने ज्या जहाजांद्वारे ड्रिल केले आहे. ती H-6J सात YJ-12 सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रे घेऊन जाऊ शकतात. ज्यामधील 6 याच्या पंखांखाली लागू शकतात. या ड्रिलला संरक्षण मंत्रालयाने रूटीन म्हटले आहे आणि युद्धाच्या वेळी तयार होण्यासाठी सराव केला जात असल्याचे म्हटले आहे.
शेनयांग ताशी 2500 किमी वेगाने उड्डाण करू शकते. सध्या चीनमध्ये या विमानाच्या 250 हून अधिक युनिट्स आहेत. हे विमान रशियाच्या एसयू 27 एसकेची परवाना आवृत्ती आहे. हे विमान हवाई क्षेत्र आणि जमीनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे. विमानात 30 मिमीचा कॅनन देखील आहे. तर अनेक प्रकारच्या क्षेपणास्त्र त्याच्या 10 हार्ड पॉईंटवर ठेवता येतात.
आणखी बातम्या....
भारताविरोधात चीनचा नवा डाव, नेपाळला मोहरा बनवून 'या' प्रकल्पाच्या कामाला केली सुरुवात
Sushant Singh Rajput death case: "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली"
दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करणाऱ्या १७ वर्षीय मुलानं एका दिवसांत कमावले १ लाख डॉलर
Article 370: ...म्हणून 5 ऑगस्ट हा आमच्यासाठी ऐतिहासिक नव्हे, काळा दिवस; मुफ्तींच्या लेकीची टीका
लवकरच सात नवीन Bullet Trains सुरू होणार; कोणत्या शहरांमध्ये धावणार, जाणून घ्या...
CoronaVirus News : कोरोना व्हायरस पाण्यामुळे मरतो, रशियन शास्त्रज्ञांचा दावा