शनिवारी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे , नेहरू-गांधी घराण्यातील सहावा पक्षप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 01:39 AM2017-12-11T01:39:05+5:302017-12-11T01:39:24+5:30

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आले.

 Saturday, Rahul Gandhi is the Congress president, Nehru-Gandhi family's sixth leader | शनिवारी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे , नेहरू-गांधी घराण्यातील सहावा पक्षप्रमुख

शनिवारी राहुल गांधींकडे काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे , नेहरू-गांधी घराण्यातील सहावा पक्षप्रमुख

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची विनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी होईल व शनिवारी १६ डिसेंबर रोजी राहुल गांधी पक्षप्रमुखपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारतील, असे पक्षाच्या सूत्रांकडून रविवारी सांगण्यात आले.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्जमागे घेण्याचा सोमवार ११ डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. या पदासाठी राहुल गांधी हे एकमेव उमेदवार असून, त्यांच्या वतीने दाखल केलेले सर्व ८९ उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन व सदस्य मधुसूदन मिस्त्री व भुवनेश्वर कलिता राहुल गांधी यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करतील, अशी अपेक्षा आहे.
रामचंद्रन यांनी सांगितले की, निवडीची घोषणा सोमवारी झाली, तरी अध्यक्षपदी नेमणुकीचे अधिकृत प्रमाणपण राहुल गांधी यांना १६ डिसेंबर रोजी मावळत्या पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व अन्य ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत दिले जाईल. त्या दिवशी सकाळी ११ वाजता १३२ वर्षांच्या जुन्या पक्षाची धुरा अध्यक्ष या नात्याने स्वीकारल्यानंतर राहुल गांधी काँग्रेस मुख्यालयात देशभरातून आलेल्या पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतील.
दोनच दिवसांपूर्वी वयाची ७१ वर्षे पूर्ण केलेल्या सोनिया गांधी यांनी सर्वाधिक काळ म्हणजे १९ वर्षे पक्षाध्यक्षपद सांभाळले. त्यांच्याकडून ती जबाबदारी ४७ वर्षांच्या राहुल गांधींकडे येण्याने पक्षाचे नेतृत्व नव्या पिढीकडे जाईल. राहुल यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद नेहरू-गांधी घराण्याच्या पाचव्या पिढीकडे आणि सहाव्या सदस्याकडे जाईल. या घराण्यातील मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि सोनिया गांधी हे या आधीचे पक्षाध्यक्ष होते.

काँग्रेसला सरकार

स्वातंत्र्यानंतर ५० वर्षांहून अधिक काळ देशावर राज्य केलेल्या काँग्रेस पक्षाची गेल्या काही वर्षांत झपाट्याने होत असलेली घसरण रोखून पक्षाला नवसंजीवनी देण्याचे शिवधनुष्य राहुल गांधी यांना पेलावे लागणार आहे. एके काळी देशाच्या कानाकोपºयात सत्ता असलेल्या काँग्रेसकडे फक्त पाच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये सत्ता आहे.

Web Title:  Saturday, Rahul Gandhi is the Congress president, Nehru-Gandhi family's sixth leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.