राजमुंदरी/एटा/लुधियाना : आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये शनिवारी झालेल्या तीन भीषण अपघातांमध्ये एकूण ४६ लोक ठार झाले असून, भाविकांसह इतर प्रवाशांसाठी हा घातवार ठरला आहे.आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील दौलतेश्वरम येथे देवदर्शनावरून परतणारी एक व्हॅन सकाळी पुलावरून गोदावरी नदीच्या पात्रात कोसळल्याने ७ मुलांसह २२ भाविकांचा मृत्यू झाला. तिरुपतीला दर्शन घेऊन परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. सर्व भाविक विशाखापट्टणमजवळील अच्युतापुरम येथील रहिवासी होते. या अपघातातून केवळ एक बालक बचावला असून, त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे वाहन रेलिंगवर आदळले आणि रेलिंग तुटल्यामुळे ते नदीच्या पात्रात कोसळले. मृतांमध्ये आठ महिला आणि चालकासह सात पुरुषांचा समावेश आहे. गाडीचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)१९ भाविकांवर काळाचा घाला1) उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील पुरा गावात ट्रक आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची भीषण टक्कर होऊन किमान १९ जण ठार तर ३३ जखमी झाले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले असून, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदतीची घोषणा त्यांनी केली. 2 )वरिष्ठ पोलीस अधीक्षक आर.पी. गुप्ता यांनी सांगितले की, मलावन पोलीस स्टेशनअंतर्गत पुरा गावात भागवत पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतून भाविक थोड्या अंतरावरील धरणावर पाणी भरण्यासाठी जात होते. मार्गात एका ट्रकने मागून एका ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली. या धडकेने ही ट्रॉली पुढील दुसऱ्या ट्रॉलीवर चढली. वायुगळतीने ५ मृत्युमुखीलुधियाना (पंजाब): अमोनिया वायू वाहून नेणारा एक टँकर पहाटे येथून २५ कि.मी. अंतरावरील उड्डाणपुलाखाली जाऊन अडकल्यानंतर झालेल्या वायुगळतीत ५ जणांचा मृत्यू झाला, तर १०० गावकऱ्यांना श्वासोच्छ्वासाचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर विषारी वायू दोराहा गाव आणि आजूबाजूच्या लोकवस्तीत पसरला, असे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शनिवार ठरला घातवार
By admin | Published: June 14, 2015 2:29 AM