नाशिक : तंत्रशिक्षण संचालनालय विभागीय कार्यालय नाशिक व गुरू गोविंदसिंग फांउडेशन, नाशिक व सहआयोजित इंजिनिअरिंग व डिप्लोमा प्रवेश इच्छुक विद्यार्थ्यांसाठी डीटीई कॅप २०१६ च्या वतीने नवीन प्रवेश प्रक्रिया व नियमांबाबत शनिवारी (दि.२८) मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान महाकवी कालिदास कलामंदिर येथे हा कार्यक्रम होईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी परमिंदर सिंह यांनी दिली.इ. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित केले असून, तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक डी.पी. नाथे, शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी हे मार्गदर्शन करणारआहेत. यासाठी नाशिकरोड (बिटको), आडगाव नाका, पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, पपया नर्सरी (सातपूर) येथून सकाळी ९.३० वा. विनामूल्य बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सदर मार्गदर्शन सत्राचा सर्व विद्यार्थी व पालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गुरुगोविंदसिंह फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे. --
इंजिनिअरिंग डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी शनिवारी मार्गदर्शन सत्र
By admin | Published: May 25, 2016 10:59 PM