शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

कर्मचारी ते सुपर बॉसची खुर्ची; ट़ॉप CEO ची सक्सेस स्टोरी; तरुणांना दिला लाखमोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:08 AM

Satya Nadella : सत्या नडेला यांनी तरुणांना करिअरबाबत एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे.

मायक्रोसॉफ्ट या दिग्गज आयटी कंपनीचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांनी तरुणांना करिअरबाबत एक लाखमोलाचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, नोकरी किंवा व्यवसायात नेहमी तुमच्याकडे असलेले काम सर्वात महत्त्वाचे आहे असे गृहीत धरा. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी मायक्रोसॉफ्टमध्ये कर्मचारी म्हणून रुजू झालेले सत्या नडेला आज कंपनीचे सीईओ आहेत. करिअर आणि आयुष्याबाबतचा त्यांचा विचार स्पष्ट होता, त्यामुळेच प्रत्येक पावलावर यश मिळाल्याचं त्यांनी सांगितले.

लिंक्डइनचे सीईओ रायन रोसलँस्की यांना दिलेल्या मुलाखतीत नडेला म्हणाले की, मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत असताना सीईओ बनण्याचा विचार त्यांच्या मनातही आला नव्हता. त्यांना जी काही भूमिका मिळाली त्यात त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली.

"सर्व कामं मनापासून करा"

जेव्हा नडेला यांना मायक्रोसॉफ्टमध्ये त्यांच्या 30 वर्षांच्या काळात शिकलेल्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, "ऑफिसमध्ये सर्वोत्तम काम करत राहा आणि तुम्ही कुठेही असलात तरी चांगले काम करण्यासाठी पुढील नोकरीची वाट पाहू नका. तिथे पूर्ण समर्पणाने नोकरी करा."

नडेला म्हणाले की मायक्रोसॉफ्टमधील त्यांच्या 30 वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही त्यांचे काम हलके घेतले नाही आणि मी करत असलेले काम महत्त्वाचे आहे याची जाणीव झाली. हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. अशा प्रकारे, उत्साहाने, वचनबद्धतेने आणि जबाबदारी घेण्याच्या तयारीने, नडेला पुढे गेले आणि एक दिवस आला जेव्हा ते कंपनीचे सीईओ बनले.

"करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःचे काम चांगले करणे आवश्यक"

मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला म्हणाले की, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःचे काम चांगले करणे आवश्यक आहे. तुमची सध्याची नोकरी तुमच्या करिअरमध्ये अडथळा आणत आहे किंवा तुम्हाला प्रगती करण्यापासून रोखत आहे असा विचार करू नका. प्रत्येक नोकरी आणि क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तुमच्यात समर्पण आणि उत्सुकता असली पाहिजे. या विचाराने, तुम्ही दीर्घकाळात तुमच्या करिअरमध्ये चांगल्या ठिकाणी असाल. सत्या नडेला म्हणाले की, सीईओ झाल्यानंतरही अनेक नवीन गोष्टी शिकत राहिलो आहे. एका हिंदी  वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी