ंंअखेर सत्यजित नेमाने निलंबित विभागीय चौकशी : शिरसोली तलाठीकडे पिंप्राळ्याचा पदभार
By admin | Published: February 22, 2016 11:57 PM
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. त्यांचा पदभार शिरसोलीचे तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविला आहे.दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ...
जळगाव : सात बारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पिंप्राळा येथील तलाठी सत्यजित नेमाने यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्यानंतर प्रातांधिकारी अभिजित भांडे यांनी सोमवारी त्यांना निलंबित केले आहे. त्यांचा पदभार शिरसोलीचे तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविला आहे.दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ फेब्रुवारी रोजी पकडले होते. त्यानंतर उपअधीक्षक पराग सोनवणे यांनी त्यासंदर्भातील अहवाल २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी यांना पाठविला होता.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ तील नियम ४ अन्वये प्रातांधिकारी अभिजित भांडे-पाटील यांनी २२ रोजी निलंबित केले. तसेच नेमाने यांच्याविरूद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ८ अन्वये स्वतंत्रपणे विभागीय चौकशी सुरु केली आहे.इन्फो-नेमाने यांचे मुख्यालय जामनेरनिलंबन काळात सत्यजित नेमाने यांचे मुख्यालय जामनेर तहसीलदार कार्यालय राहणार आहे. तसेच नेमाने यांनी पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये असे बजावण्यात आले आहे.विभागीय चौकशी सुरु करण्यासाठी प्रातांधिकारी यांनी आवश्यक त्या कागदपत्रांचा अहवाल मागविला आहे. तसेच पिंप्राळा तलाठी कार्यालयाचा अतिरिक्त पदभार शिरसोली येथील तलाठी नेरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. इन्फो-दुसर्यांदा निलंबित