शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात भाजपाला जमिनीचा कस लागेना? दिल्लीतून नेत्यांचे दौऱ्यांवर दौरे, काय चाललेय मनात...
2
"...म्हणून अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा भंग न करता राजीनाम्याचा घेतला निर्णय", सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं नेमकं कारण 
3
Maharashtra Vidhan Sabha : बाळासाहेब थोरातांना सुजय विखे संगमनेरमधून देणार आव्हान!
4
मुंबईतील १ काँग्रेस आमदार फडणवीसांच्या 'सागर' बंगल्यावर; भेटीमुळे चर्चेला उधाण
5
...अशा प्रकारे देशाची अर्थव्यवस्था वाढवली; पीएम मोदींनी सांगितली पुढील 1,000 वर्षांची योजना
6
दिल्लीचा मुख्यमंत्री कोण होणार? 'हे' १३ जण ठरवणार... जाणून घ्या, कधी नाव घोषित केलं जाणार?
7
कोट्यवधींच्या मालक आहेत राधिका गुप्ता, तरीही लक्झरी कार नकोय; कारण ऐकून अवाक् व्हाल 
8
"अजित पवार काही दिवसांनी शरद पवारांकडे दिसतील"; बच्चू कडूंचे मोठे विधान
9
Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई
10
"मी चूक मान्य करतो पण तिला..."; बंगळुरुमधील 'त्या' ऑटो चालकाने सांगितली दुसरी बाजू
11
दिल्लीला आज नवीन मुख्यमंत्रीच नाही तर दोन मंत्रीही मिळणार; केजरीवालांच्या घरी बैठक सुरु
12
Bajaj Housing Finance Shares: धमाकेदार लिस्टिंगनंतर अपर सर्किट, प्रॉफिट बूक करावं की होल्ड? एक्सपर्ट म्हणाले...
13
राहुल गांधींची जीभ कापून देणाऱ्यास 11 लाखांचे बक्षीस देणार; संजय गायकवाडांचे वादग्रस्त वक्तव्य
14
धक्कादायक! काँग्रेसच्या आमदाराच्या मुलानं बदनाम करून मोडलं लग्न, तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
15
पळण्याच्या तयारीत असतानाच जवानांनी दहशतवाद्याला घातले कंठस्नान, बारामुल्लातील ड्रोन व्हिडीओ
16
भाजपाची हरियाणात मोठी खेळी! सिरसा मतदारसंघातील उमेदवार घेतला मागे
17
रेल्वे अपघातांमागील कटाबाबत अश्विनी वैष्णव म्हणाले, "प्रत्येकाला पकडू आणि तुरुंगात टाकू..." 
18
"माझ्याकडून चूक झाली, पण निक्कीने...", आर्याने सांगितलं नेमकं काय घडलं? बिग बॉसवर व्यक्त केली नाराजी
19
Bigg Boss Marathi Season 5: बिग बॉसमध्ये परत बोलवलं तर जाणार का? आर्या म्हणाली...
20
Northern Arc Capital IPO पहिल्याच दिवशी ओव्हरसबस्क्राईब, ग्रे मार्केटमध्ये शेअर रॉकेट; एक्सपर्ट म्हणाले...

सत्यम घोटाळा: रामलिंग राजूना ७ वर्षांची शिक्षा

By admin | Published: April 09, 2015 11:59 AM

देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स' घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. ९ - देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट घोटाळा ठरलेल्या 'सत्यम कॉम्प्युटर्स' घोटाळाप्रकरणातील दोषी रामलिंग राजू यांना ७ वर्षांचा कारावास आणि पाच कोटींचा दंड  ठोठावण्यात आला आहे. गुरूवारी हैदराबादमधील विशेष न्यायालयाने बी. रामलिंग राजूंसह दहा जणांना दोषी ठरवले. विशेष न्यायाधीश बीव्हीएल एन. चक्रवर्ती यांनी हा निकाल दिला असून रामलिंग राजू यांना फसवणूक, विश्वासघात, खोटी कागदपत्रे बनविणे आणि ‘क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट‘ या गुन्ह्यांखाली दोषी ठरवले असून त्यांना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. सुमारे सहा वर्षे चाललेल्या या खटल्यात तीन हजार कागदपत्र व २२६ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. याप्रकरणी राजू यांनी आधीच ३२ महिने (सुमारे अडीच वर्ष) तुरूंगात काढले आहेत.
आर्थिक गैरव्यवहारांसाठीच्या विशेष न्यायालयाने ‘सत्यम'चे माजी अध्यक्ष बी. रामलिंगम राजूंसह त्याचा भाऊ बी. रामा राजू (व्यवस्थापकीय संचालक, सत्यम), वदलमणी श्रीनिवास (माजी मुख्य वित्तीय अधिकारी), जी. रामकृष्ण (माजी उपाध्यक्ष) व अंतर्गत हिशेब तपासणी विभागप्रमुख व्ही.एस. प्रभाकर गुप्ता आदींवर १४ वर्षे भांडवली बाजारात कोणत्याही पद्धतीने सहभागी होण्यास बंदी घातली आहे.
 
काय आहे 'सत्यम घोटाळा'
७ जानेवारी २००९ रोजी त्या वेळी देशातील चौथ्या क्रमांकाची आयटी कंपनी म्हणून नावाजलेल्या सत्यमचा संस्थापक असलेले रामलिंग राजू यांनी सेबीला ई-मेल पाठवून आपण कंपनीच्या जमा खात्यातील रकमेचा आकडा तसेच बँकांमधील ठेवींची रक्कम फुगवून सांगितल्याची कबुली दिली. या फसवणूकीमुळे कंपनीचे १४ हजार १६२ कोटींचे नुकसान झाले होते. त्यानंतर सीबीआयने राजू यांच्यासह कंपनीतील अन्य १० जणांवर गुन्हा दाखल केला होता.