नवी दिल्ली : गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या कार्यालयात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी धरणे आंदोलन करत आहे. त्यांच्या आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे. मात्र. या आंदोलनात सहभागी झालेले आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री तब्येत बिघडली. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, सत्येंद्र जैन यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच थांबावे लागणार आहे. सध्या त्यांना ग्लुकोज देण्यात येत आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्या मंत्र्यांचे दैनंदिन रुटिन चेकअप सुरु आहे. रविवारी सकाळपासून सत्येंद्र जैन यांची तब्येत खालवली होती. तपासणी केली त्यावेळी त्यांचे वजन 78.5 किलो असल्याची नोंद होती. दरम्यान, सत्येंद्र जैन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा ट्विटवरुन दिली आहे.
धरणं धरलं अन् आरोग्यमंत्र्यांचं आरोग्य बिघडलं, रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 11:14 AM
गेल्या सात दिवसांपासून धरणे आंदोलन करत असलेले दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठळक मुद्देआरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांची तब्येत बिघडलीएलएनजेपी रुग्णालयात दाखलआंदोलनाचा आजचा आठवा दिवस