शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

Saurabh Bharadwaj : "पंजाब आणि दिल्लीत AAP फोडण्याचा प्रयत्न"; सौरभ भारद्वाज यांचा भाजपावर मोठा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 2:08 PM

AAP Saurabh Bharadwaj And BJP : दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. भाजपाला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपल्या जाळ्यात अडकवायचं आहे. याशिवाय भाजपाला पंजाब-दिल्लीमध्येही आम आदमी पार्टी (AAP) फोडायची आहे. भाजपाला माहीत आहे की, पंजाब आणि दिल्लीत 'आप'ला पराभूत करता येणार नाही. त्यामुळेच आपचे खासदार आणि आमदार यांना फोडून नेलं जात आहे असा दावाही सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. 

"30 ऑक्टोबर 2023 रोजी अरविंद केजरीवाल यांना पहिलं समन्स आल्यापासून केजरीवाल काही गोष्टी बोलत आहेत. ते म्हणाले होते की, ईडीचा उद्देश हा त्यांना खोट्या खटल्यात अडकवून जेलमध्ये पाठवणे आणि नंतर दिल्ली आणि पंजाबमधील 'आप'च्या आमदारांना भाजपामध्ये आणणे आणि सरकार, पक्ष फोडणं, हा आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवून भाजपा 'आप'ला पराभूत करू शकत नाही" असंही सौरभ यांनी म्हटलं आहे. 

 पंजाबमधील आम आदमी पक्ष हा सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस-अकाली दल दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाबमध्ये भाजपाची अवस्था एवढी वाईट असताना ‘आप’चे खासदार, आमदार का फोडत आहेत?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पंजाबमधील अनेक आमदारांना भाजपामध्ये सामील होण्यासाठी पैसे, पद आणि Y+ सुरक्षा देऊ करण्यात आली होती.

आमचे जालंधरचे खासदार रिंकू यांचा कार्यकाळ संपला आहे. आता त्यांना निवडणूक लढवायची होती. जालंधरमध्ये भाजपा चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी एक खासदार भाजपामध्ये का जाईल? बुधवारी पंजाब आम आदमी पक्षाच्या तीन आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, त्यांना फोनवरून भाजपामध्ये सामील होण्याचे आमिष दाखवण्यात आले. दिल्ली आणि पंजाबमध्ये आमचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवले जात आहे. ज्या फोनवरून फोन आला होता तो नंबरही आमदारांनी जाहीर केला आहे असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाPoliticsराजकारण