Saurabh Rajput Muskan Rastogi: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या मेरठ हत्याकांडातील सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल हे सध्या मेरठच्या तुरुंगात आहेत. हत्येची घटना उजेडात आल्यापासून मुस्कानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, आता तिचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर फिरवला जात असून, ज्यात ती आणि पोलीस अधिकारी किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवला आहे. हा डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
डीपफेक व्हिडीओतील पोलीस कोण?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ डीपफेक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हा व्हिडीओ बनवला गेला आहे. या व्हिडीओ आरोपी मुस्कान आणि ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याचे प्रमुख रमाकांत पचौरी हे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा >>फ्लॅटला कुलूप तरी आतून वाहत होतं रक्त; पोलिसांनी दरवाजा उघडून पाहिलं तर बसला धक्का
वाईट हेतून हा व्हिडओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला असून, हा व्हिडीओ ज्यांनी अपलोड केला आहे, त्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी करमवीरी सिंह यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला व्हिडीओ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियांशू नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. पोलिसांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
मेरठचे पोलीस आयुक्त आयुष विक्रम सिंह या प्रकाराबद्दल बोलताना म्हणाले की, "वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम यूजरविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल."