सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कसलाही गुन्हा केला नाही; राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 12:14 PM2021-08-10T12:14:35+5:302021-08-10T12:16:34+5:30
डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra )
जयपूर - राजस्थानचे शिक्षण मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा यांनी सोमवारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Savarkar did not commit any crime by demanding a hindu rashtra Says Rajasthan congress chief govind singh dotasra)
डोटासरा म्हणाले, दिवंगत हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता, हे कुणीही नाकारू शकत नाही. सावरकर देशासाठी तुरुंगातही गेले. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची मागणी करून कोणताही गुन्हा केला नाही, उलट त्यांची ही मागणी न्याय्यच होती, सावरकरांच्या अनेक मागण्या योग्य होत्या. मात्र, त्यांच्या विचारधारेवर लोकांचा आक्षेप होता, असेही डोटासरा म्हणाले. ते ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त एका कार्यक्रमात बोलत होते.
डोटासरा म्हणाले, सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेतला होता. ते हिंदू राष्ट्राबद्दल बोलत होते, जे चुकीचे नव्हते, कारण त्यावेळी आपला देश स्वतंत्र नव्हता आणि आपले संविधान बनलेले नव्हते. मात्र, जेव्हा आपले संविधान बनवले गेले, तेव्हा स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात सर्व धर्म स्वीकारले गेले. यानंतर, भाजप आणि आरएसएसने त्यांची विचारधारा भावांमध्ये वैर निर्माण करण्यासाठी वापरली आणि आम्ही त्याच्या विरोधात आहोत.
काँग्रेस नेत्याच्या तोंडून सत्य बाहेर आलंच -
डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक परनामी, माजी मंत्री यूनुस खान आणि आमदार अशोक लाहोटी यांनी म्हटले आहे, की अखेर काँग्रेस नेत्यांच्या तोंडी सत्य आलंच. ते म्हणाले, सावरकर आमचे मार्गदर्शक होते, आहेत आणि सदैव राहतील.
"खेळाडूंना फोन कॉल पुष्कळ झाले, आता बक्षीस द्या;" राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा