शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

काँग्रेसच्या 'भारत जोडो' यात्रेत सावरकरांचा फोटो, भाजपचा चिमटा; काँग्रेसचे स्पष्टीकरण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 7:57 PM

काँग्रेस आणि भाजप नेते परत एकदा वीर सावरकरांवरुन आमने सामने आले आहेत.

नवी दिल्ली: वीर सावरकर पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. केरळमध्ये काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’दरम्यान काँग्रेसच्या पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांच्या फोटोंमध्ये सावरकरांचा फोटो दिसल्यानंतर हे प्रकरण उफाळून आले आहे. काँग्रेसच्या दौऱ्यात वीर सावरकरांचा फोटो दाखवल्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने राहुल गांधींपासून ते जवाहरलाल नेहरूंपर्यंत सर्वांची खिल्ली उडवली, तर काँग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला. बटेश्वर प्रकरणात वीर सावरकरांची माफी आणि अटलबिहारी वाजपेयी यांची साक्ष यासंबंधीचा वादही त्यांनी उघड केला.

छपाईदरम्यान चूक झालीभाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 'भारत जोडो यात्रे'च्या पोस्टरचा फोटो ट्विट केला होता. त्यात स्वातंत्र्यसैनिकांच्या मधोमध वीर सावरकरांचा फोटोही आहे. यावर काँग्रेसने स्वतःचा बचाव करत याला प्रिंटिंग मिस्टेक म्हटले आहे. पोस्टरवर स्वातंत्र्यसैनिकांचे चित्र हवे होते, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. एका बूथ स्तरावरील कार्यकर्त्याने सांगितले की, पोस्टर डिझाइन करणाऱ्या मुलाने हे फोटो ऑनलाइन शोधले होते. त्यांने नीट न तपासता ही छपाई केल्याचे काँग्रेसचे म्हणने आहे.अमित मालवीय यांची खोचक टीकाहे पोस्टर केरळमधील एर्नाकुलम विमानतळाजवळ लावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या फोटोसोबत अमित मालवीय यांनी लिहिले – 'एर्नाकुलममध्ये काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वीर सावरकरांचाही फोटो आहे. उशीरा का होईना, राहुल गांधींना जाणीव झाली. राहुल यांचे पणजोबा नेहरू पंजाबच्या नाभा तुरुंगात असताना इंग्रजांना विनंती करुन अवघ्या दोन आठवड्यांत बाहेर आले होते.' 

जयराम यांचा भाजपवर पलटवारअमित मालवीय यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पलटवार केला आहे. 'तुम्हाला वस्तुस्थिती माहित नाही. एखाद्या गोष्टीला चुकीच्या पद्धतीने दाखवून, तुम्ही बदनामी करता. आम्ही त्यांच्याविरोधात मानहानीची नोटीस पाठवत आहोत. भारतीय कम्युनिस्ट पक्षही असे प्रश्न उपस्थित करत आहे. व्हीपी सिंग सरकारच्या काळात सीपीएम आणि भाजपची युती होती, तसाच प्रकार सुरू आहे,' असं ते म्हणाले.खेरांनी ‘बटेश्वर साक्षी’चा मुद्दा उपस्थित केलाकाँग्रेस नेते पवन खेरा यांनीही याबाबत भाजपला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की जवाहरलाल नेहरू यांनी सुमारे 10 वर्षे तुरुंगात घालवली आणि त्यांनी कधीही दयेचा अर्ज लिहिला नाही. प्रथम सावरकरांनी, नंतर अटलबिहारी वाजपेयी आणि इतरांनी लिहिला. बटेश्वरच्या साक्षीचे काय?' असा प्रश्न त्यांनी भाजपला विचारला.

काय आहे 1942चे बटेश्वर प्रकरण?

बटेश्वरचे प्रकरण 1942 सालचे आहे. या वादाने अटलबिहारी वाजपेयींचा कधी पिच्छा सोडला नाही. अटलबिहारी वाजपेयी हे आग्रा जवळील बटेश्वरचे रहिवासी होते. त्यांच्यावर आरोप आहे की, 1942 मध्ये 'भारत छोडो' आंदोलन सुरू असताना त्यांनी वनविभागाच्या कार्यालयावर तिरंगा फडकवण्याच्या घटनेची इंग्रजांसमोर साक्ष दिली होती, त्यामुळे 4 स्वातंत्र्यसैनिकांना शिक्षा झाली होती. वाजपेयींनी या वादातून अनेकवेळा दूर जाण्याचा प्रयत्न केला, पण 2004 मध्ये त्यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत लढवणारे राम जेठमलानी यांनी ही बाब समोर आणली होती. लीलाधर वाजपेयी यांना पुढे करून त्यांनी या वादाला खतपाणी घातले होते. बटेश्वर प्रकरणात तुरुंगात गेलेल्या लोकांपैकी लीलाधर वाजपेयी हेदेखील एक होते.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा