नवी दिल्ली : अर्थव्यवस्था, कायदा सुव्यवस्था, बेरोजगारी या परिस्थितीमुळे देशातील वातावरण ‘अंधेर नगरी चौपट राजा’प्रमाणे झाले आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी लोकांनी घराबाहेर येऊ न आंदोलन करायला हवे, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी शनिवारी दिल्लीच्या रामलीला मैदानात केले. काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ मेळाव्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक आले होते.
‘तरुणांच्या नोकºयाही जात आहेत. शेतकºयाचे जगणे कठीण झाले आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली आहे. देशाचा खजिना रिकामा आहे, तरीही मोदी-शहा हेच ‘अच्छे दिन’ असल्याचे सांगतात. ‘सबका साथ, सबका विकास’ कुठे आहे? मजबूत अर्थव्यवस्था कुठे आहे? काळा पैसा कुठे गेला? या सर्वांची चौकशी व्हायला हवी.यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेशबघेल यांच्यासह सर्व नेते उपस्थित होते. मुकुल वासनिक यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन केले होते. उपस्थितांनी राहुल गांधी यांचा जल्लोष केला. ती गर्दी, घोषणा पाहून त्यांनी मुकुल वासनिक यांना पुढे बोलावून त्यांचे कौतुक केले.भारताच्या शत्रूंनी नव्हे, तर पंतप्रधानांनी अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजविले आहेत. त्यांनी पंधरा ते वीस मोठ्या उद्योगपतींचे ६० हजार कोटींचे कर्ज माफ केले. जनतेच्या खिशाला कात्री लावायची आणि दुसरीकडे उद्योगपतींचे कर्ज माफ करायचे, असे मोदींचे धोरण आहे. - राहुल गांधीमोदी यांनी २०२४पर्यंत भारतात ‘५ ट्रिलीयन’ अर्थव्यवस्था असेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढेल आणि दोन कोटी नव्या नोकºया देऊ, अशी आश्वासने त्यांनी दिली, पण कुठलेही आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. - डॉ. मनमोहन सिंगसध्याच्या परिस्थितीत लढा न देणाºया लोकांना भविष्यात भ्याड ठरविले जाईल. राज्यघटना धोक्यात असताना आपल्याला आवाज उठवावाच लागेल. देशावर प्रेम असेल, तर आवाज बुलंद करा. आज शांत बसलो, तर उद्या राज्यघटनेचे अस्तित्व नष्ट झालेले दिसेल. देशाचे विभाजन सुरू होईल आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या पापासाठी आपण जबाबदार ठरू.- प्रियांका गांधी