नवी दिल्ली - वर्षभरापूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेल्या सावित्रीबाई फुले यांनी आपला राजीनामा दिला आहे. भारतीय जनता पक्ष सोडून सावित्रीबाई काँग्रेसमध्ये दाखल झाल्या होत्या. आता त्यांनी स्वंतत्र पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे.
बहराईच मतदार संघाच्या माजी खासदार सावित्रीबाई यांनी 6 डिसेंबर 2018 रोजी भाजपधून राजीनामा दिला होता. त्यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण केला होता. काँग्रेसमध्ये आपलं कोणीही ऐकत नाही. त्यामुळे मी राजीनामा देत आहे. आता आपण स्वत:चा पक्ष काढणार आहोत.
2012 मध्ये सवित्रीबाई भाजपकडून बहराईचमधून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यातही त्या विजयी झाली होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.