...म्हणे अमेरिका, इंग्लंडपेक्षाही मध्य प्रदेश सरस ; पुन्हा बोलले शिवराजसिंह चौहान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2017 01:53 PM2017-11-03T13:53:41+5:302017-11-03T14:03:52+5:30
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे.
भोपाळ - काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे रस्ते अमेरिकेच्या रस्त्यांपेक्षा चांगले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विरोधकांनी आणि सोशल मीडियाने मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली आली होती. त्यांनी पुन्हा एकदा असंच वक्तव्य केलं आहे. मध्य प्रदेश, अमेरिका आणि इंग्लंडसह इतर अनेक देशांपेक्षा आघाडीवर असल्याचं त्यांनी आता म्हटले आहे.
मध्य प्रदेशच्या 62 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केवळ गुलाम मानसिकतेचे लोकच दुसरा देश आपल्या देशापेक्षा चांगला समजतात असं ते म्हणाले. मध्य प्रदेश, अमेरिका आणि इंग्लंड आदी देशांपेक्षा चांगला आहे. पण हे पाहण्यासाठी सकारात्मक विचार आणि आपल्या प्रदेशाबाबत अभिमान असणं गरजेचं आहे असं चौहान म्हणाले. मध्य प्रदेश हे झपाट्याने विकास होणारं राज्य आहे. गुलाम मानसिकता असलेलेच दुस-या देशाला आपल्या देशापेक्षा चांगलं समजतात असं ते म्हणाले.
चौहान यांनी नुकताच अमेरिका दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमात मध्य प्रदेशमधील रस्त्यांचे कौतुक केले होते. मी जेव्हा वाश्गिंटन विमानतळावर उतरून शहराकडे येत होतो. तेव्हा मला अमेरिकेपेक्षा मध्य प्रदेशमधील रस्ते चांगले असल्याची जाणीव झाली, असे ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती तर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.