शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांची घुसखोरी; मोठा घातपात घडवण्याचा कट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 7:33 AM

आज किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा हल्ला घडवण्याचा कट

श्रीनगर: जैश-ए-मोहम्मदच्या सात दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला करण्याच्या उद्देशानं जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे. इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियानं गुप्तचर विभागातील सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. घुसखोर दहशतवादी ईद (आज) किंवा स्वातंत्र्य दिनाच्या आधी मोठा घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.  भारतात दहशतवादी हल्ला घडवण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयनं जैश-ए-मोहम्मदला हिरवा कंदील दाखवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर दहशतवादी घोषित करण्यात आलेला मसूद अजहर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आहे. जास्तीत जास्त जीवितहानी होईल अशा भागांमध्ये हल्ले करा, अशी सूचना आयएसआयकडून जैशला करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. घुसखोर दहशतवादी एखाद्या मशिदीवर हल्ला करू शकतात. त्यामुळे पाकिस्तानला भारतावर आरोप करण्याची संधी मिळेल, असा अंदाज सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पोलीस दलातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैशच्या सात दहशतवाद्यांनी बनिहालच्या दक्षिण आणि पीर पंजालच्या पर्वतील भागातून घुसखोरी केली आहे. सध्या हे दहशतवादी राजौरी किंवा पूँछमध्ये लपले असावेत, अशी शक्यता एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं व्यक्त केली. 'सात दहशतवादी अनंतनाग हायवे आणि त्याच्या आसपासच्या भागात हल्ले घडवू शकतात. त्यांच्याकडून नागरी वस्त्या आणि सुरक्षा दलांची कार्यालयं लक्ष्य केली जाऊ शकतात,' असा अंदाज दक्षिण काश्मीर दलातील सूत्रांनी वर्तवला. मोदी सरकारनं गेल्याच आठवण्यात कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय जम्मू-काश्मीरचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आलं. नेमक्या याच पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट समोर आला आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ट्विटरवर प्रचंड सक्रीय झाले आहेत. मुस्लिम देशांना भारताविरुद्ध भडकावण्याचे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. मोदींच्या नेतृत्त्वाखालील भाजपा सरकारची तुलना त्यांनी थेट जर्मनीतील नाझींशी केली आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरJaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदmasood azharमसूद अजहरTerror Attackदहशतवादी हल्ला