नवी दिल्ली - पब्लिक सेक्टरमधील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) आपल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी दिली आहे. एसबीआयने होम लोन आणि ऑटो लोनवरील व्याजदरात 0.05 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे गृह कर्जाचे व्याजदर आता 8.35 टक्क्यांवरून 8.30 टक्के झाले आहे. तर वाहन कर्जाचे व्याजदर 8.75 वरून घटून 8.70 टक्के इतके झाले आहे. नवीन व्याजदर हे 1 नोव्हेंबरपासून लागू झाले आहेत.
या कपातीनंतर एसबीआयच्या गृहकर्जाचे व्याज दर हे सर्वांत कमी असतील असं एसबीआयकडून एका विधानात सांगण्यात आलं आहे. एसबीआयने व्याज दरात केलेल्या कपातीनंतर इतर बँकाही व्याज कपातीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.यापूर्वी काल स्टेट बॅंक ऑफ इंडियाने फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (Cमसीएलआर) 0.05 टक्क्यांची कपात केली होती.एमसीएलआरमध्ये गेल्या 10 महिन्यांनंतर पहिल्यांदाच ही कपात झाली.