शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

नववर्षात 'एसबीआय'कडून स्वस्त कर्जांचं गिफ्ट, आयडीबीआय, युनियन बँकेकडून व्याजदरात कपात

By admin | Published: January 01, 2017 4:35 PM

भारतीय स्टेट बँक (एसबीआय)नं नव्या वर्षात नव्या ग्राहकांसाठी स्वस्त कर्जाचं गिफ्ट दिलं आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. १ - नोटाबंदीनंतर बँकांत मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा झाल्या आहेत. याचा लाभ गरीब आणि मध्यमवर्गीयांना करून देण्याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर आता एसबीआय, आयडीबीआय, युनियन बँकेकडून कर्जाच्या आधारभूत दरात ०.९० टक्के कपात करण्यात आली आहे. याचे अनुकरण अन्य बँकांकडूनही होण्याची शक्यता आहे. २००८ नंतरच्या जागतिक मंदीनंतरची ही सर्वात मोठी व्याजदर कपात समजली जात आहे. नवे दर १ जानेवारीपासून लागू असतील. या निर्णयानंतर आधारभूत दर आता ८.६५ टक्क्यांवरुन आता ७.७५ टक्के झाले आहेत. एका वर्षाच्या कर्जासाठी हे दर ८.९० टक्क्यांवरुन ८ टक्के झाले आहेत. दोन वर्षांच्या कर्जासाठी हे दर ८.१० टक्के तर तीन वर्षांच्या कर्जासाठी ८.१५ टक्के झाले आहेत. विविध बँकांकडून कर्जाच्या आधारभूत दरात (एमसीएलआर) कपातीस सुरुवात होऊ शकते. शुक्रवारी आयडीबीआय आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोर यांनी एमसीएलआरमध्ये १५ ते ४० बेसिस पॉइंटची कपात केली आहे. अन्य बँकांकडूनही असे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. अर्थात, अनेक बँकांकडून आता ठेवीवरील व्याज दरातही कपात केली जाऊ शकते. आगामी काळात जे होम लोन किंवा अन्य कर्ज घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी हे शुभ संकेत आहेत. बँकींग क्षेत्राचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, इतक्या कमी काळात बँकात मोठ्या प्रमाणात निधी प्रथमच जमा झाला आहे. एसबीआयचे गृह कर्ज आता महिलांसाठी ८.२० टक्क्यांनी तर, इतरांसाठी ८.२५ टक्क्यांनी मिळणार आहे. युनियन बँक आॅफ इंडियाने कर्जाच्या आधारभूत दरात ६५ बेसिस पॉइंटने कपात केली आहे. हे दर आता ८.६५ टक्के असतील. आयडीबीआय आणि स्टेट बँक आॅफ त्रावणकोरने कर्ज दरात कपात केली असून हे दर आता ८.९० ते ९.३० टक्के असणार आहेत. नोटाबंदीनंतर बँकांकडे १४.९ लाख कोटी रुपयांचे डिपॉझिट आले आहे. कर्जाचा दर घटवल्यामुळे आता गृह कर्ज, रिक्षा कर्ज आणि व्यक्तिगत कर्ज स्वस्त होणार आहे. जानेवारी २०१५पासून आतापर्यंत एसबीआयनं कर्जाचा दर २०० बेसिस पॉइंटनं कमी केला आहे. ओव्हरनाइट बॉरोइंगवर एमसीएलआर ८.६५ टक्क्यांवरून घसरून ७.७५ टक्के झाला आहे. तीन वर्षांसाठी कर्ज घेतल्यास एमसीएलआर ९.०५ टक्क्यांवरून घसरून ८.१५ टक्के इतका घसरला आहे.