नवी दिल्ली : देशाची सर्वात मोठी बँक म्हणून बिरुदावली मिरविणाऱ्या एसबीआयवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गंभीर आरोप केले आहेत. बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार आणि सीतारामन यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामध्ये सीतारामन यांनी एसबीआय निर्दयी आणि अकार्यक्षम असल्याचे म्हटले आहे.
एसबीआयचा वित्तीय समावेशक कार्यक्रम 27 फेब्रुवारीला आयोजित करण्यात आला होता. या कार्य कार्यक्रमाला सर्व बँका, राज्यांचे प्रतिनिधी आले होते. यावेळी सीतारामनही आल्या होत्या. आसामच्या प्रतिनिधीने आसाममधील चहापत्ती कामगारांची बँक खाती बंद केल्याचा मुद्दा मांडला. या मुद्द्यावर सीतारामन यांनी कुमारना चांगलेच झापल्याचे या क्लीपमध्ये ऐकायला मिळत आहे.
तुम्ही देशातील सर्वात मोठी बँक आहात हे सांगूच नका, तुम्ही निर्दय़ी मनाची बँक आहात. राष्ट्रीय स्तरावरील बँका अशा काम करत नाहीत. तुम्ही संबंधीत विभागाकडे संपर्क साधायला हवा होता, त्या विभागाने आरबीआयशी बोलायला हवे होते. मी मोठ्या आवाजात बोलते याचे वाईच वाटते, पण मी या कामावर संतुष्ट नाही. एसएलबीसी अशाप्रकारे काम करत नाहीत. मी या प्रकरणात काय होऊ शकते ते आरबीआयसोबत पाहून घेईन. पण तुम्ही दाखविलेल्या अकार्यक्षमतेबाबत काही करू शकत नाही. हे पुन्हा चहा पत्ती कामगारांसोबत घडू देणार नाही. तुम्ही दाखविलेल्या अकार्य़क्षमतेची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल. विश्वासास तडा जाऊ न देण्यासाठी पाऊले उचला, अशा शब्दांत सीतारामन यांनी रजनीश कुमार यांना सुनावले.
एवढ्यावरच न थांबता या चहापत्ती कामगारांना दिलासा देण्यासाठी बँक काय पाऊले उचलणार आणि किती वेळ लावणार याचीही माहिती विचारली. यावर कुमार यांनी बँक चहापत्ती कामगारांची खाती कमीत कमी वेळात पुन्हा सुरु करेल असे उत्तर देताच सीतारामन यांनी किती वेळात असा उलट प्रश्न विचारला आहे. यावर कुमार यांनी आठवडाभरात असे उत्तर दिले. तुम्ही वेळ निभाऊन नेऊ नका एसबीआयचे अध्यक्ष, मला दिल्लीत येऊन भेटा. कामातील ही अक्षम्य चूक आहे. या अपयशाला मी तुम्हालाच जबाबदार धरते. मला यावर सविस्तर बोलायचे आहे, अशी तंबीच सीतारामन यांनी दिली.
तुमच्या चुकीमुळे यापुढे एकाही कामगाराला त्रास भोगावा लागता नये, असा इशाराही सीतारामन यांनी एसबीआयला दिला.
घरीच बसा, जुनी कार विका; मारुती सुझुकीने आणली योजना
काँग्रेसच्या दोन आमदारांमध्ये कोरोनाची लक्षणे; जयपूरहून आलेल्या आमदाराचा खुलासा
अनिल अंबानींना ईडीची नोटीस; येस बँकेच्या राणा कपूरशी जोडले तार