मुंबई: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) स्पेशल केडर ऑफिसर (एससीओ) आणि डेप्युटी जनरल मॅनेजर पदांसाठी भरती आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. एसबीआयमधील रिक्त पदांसाठी अर्ज करायचा असल्यास १२ ऑगस्ट २०१९ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बँकेच्या sbi.co.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज करता येईल. मुलाखतीच्या आधारे यासाठी उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर भरती प्रक्रिया सुरू होईल.किती पदांसाठी होणार भरती?- डेप्युटी जनरल मॅनेजर (कॅपिटल प्लानिंग)- १ पद- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (सेक्टर स्पेशालिस्ट)- ११ पदं- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट (स्ट्रक्चरिंग)- ४ पदं- एसएमई क्रेडिट अॅनालिस्ट- १० पदं- क्रेडिट अॅनालिस्ट- ५० पदं- डेप्युटी जनरल मॅनेजर- १ पदं
पदांसाठी योग्यता काय?एसबीआयच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेची एमबीए, बीई/बीटेक, सीएची पदवी हवी. सर्व पदांसाठी पात्रतेचे निकष वेगवेगळे आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एसबीआयची अधिसूचना पाहावी.वयोमर्यादाडेप्युटी जनरल मॅनेजर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय जास्तीत जास्त ४५ वर्षे असावं. तर अन्य पदांसाठी वयोमर्यादा ३५ वर्षे इतकी आहे. किती वेतन मिळणार?डेप्युटी जनरल मॅनेजर पदावरील व्यक्तीला ६८,६८० ते ७६,५२० रुपये इतका पगार मिळेल. तर अन्य पदावरील व्यक्तींना ४२,०२० ते ५१,४९० रुपये इतकं वेतन मिळेल.