शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
3
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
4
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
5
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
6
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
7
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
8
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
9
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
10
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
11
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
12
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
13
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
14
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
15
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
16
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
17
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
18
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
19
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
20
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

'वर्क फ्रॉम होम' काळात SBI चा मोठा निर्णय; तब्बल 1000 कोटी रुपये वाचणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 6:07 PM

जागतिक प्रक्रियेनुसार बँक कुठूनही काम करण्याची सुविधा विकसित करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरुनही काम करता येणार आहे. मात्र, असे करताना बँक सामाजिक आयुष्य आणि कामावेळचे आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणार आहे.

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे लाखो नोकरदारांना कंपन्यांनी घरातूनच काम करण्याची मुभा दिली आहे. आता यामध्ये देशातील सर्वात मोठी बँक SBI चे ही नाव येणार आहे. भारतीय स्टेट बँकेने (State bank of India) आपल्या कर्मचाऱ्यांनादेखील कुठूनही काम करण्याची सोय देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे थोडे थोडके नव्हे तर तब्बल 1000 कोटी रुपयांची बचत केली जाणार आहे. 

स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी याची घोषणा केली आहे. कुठूनही काम करण्यासाठी बँक मुलभूत सुविधा उभारणार आहे. यामुळे बँकेच्या खर्चात मोठी कपात होणार असून जवळपास 1000 कोटी रुपये वाचणार असल्याचे ते म्हणाले. ते मंगळवारी बँकेच्या 65 व्या वार्षिक बैठकीला संबोधित करत होते. स्टेट बँक खर्चात कपात करणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांची संख्याही नेटकी आणि त्यांचे कौशल्य पुन्हा सुधारणे, उत्पादकता वाढविण्यासाठी बँक लक्ष देणार आहे. बँक कर्मचाऱ्यांना शाखांमधून बाहेर काढून त्यांना विक्री कार्यालयांमध्ये आणण्यासाठीही प्रयत्न करणार आहे. 

जागतिक प्रक्रियेनुसार बँक कुठूनही काम करण्याची सुविधा विकसित करणार आहे. यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांना घरुनही काम करता येणार आहे. मात्र, असे करताना बँक सामाजिक आयुष्य आणि कामावेळचे आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणार आहे. कोरोनाकाळात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. कोरोनाचे संकट आजही देशावर आहे. यामुळे 2020-21 हे वर्ष अन्य बँकांप्रमाणे एसबीआयलाही कठीण जाणार आहे. यासाठी बँकेला तयार रहावे लागणार आहे. बँकेच्या कर्जदारांनाही मदत मिळण्यासाठी पाऊल उचलले जात आहे. मोबाईल बँकिंग अॅप ‘एसबीआय योनो’ ने मोठी झेप घेतली आहे. याचा विस्तार आणखी वाढविण्यात येईल. पुढील काळात योनो अॅपचे वापरकर्ते दुपटीने वाढविण्यात येणार आहेत, असेही कुमार म्हणाले. भरतीही सुरुभारतीय स्टेट बँकेने पुढील 6 महिन्यांमध्ये 2000 कनिष्ठ आणि मध्यम श्रेणीच्या एक्झिक्युटीव्हची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या या योजनेविषयी माहिती असणाऱ्या दोन लोकांनी सांगितले की, ग्रामीण भागामध्ये चांगला विकास होण्यासाठी आणि बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी ही भरती करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांकडून ज्या सेवांसाठी पैसे आकारते त्या सेवांचा विस्तार ग्रामीण भागामध्ये करण्यात येणार आहे. कोरोनामुळे बँकेचे उत्पन्न घटले असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

Xiaomi आता 'हवा' देखील भरणार; टायर पंक्चर झाल्यास काही क्षणांत मदतीला येणार

काँग्रेसने हटविले, सचिन पायलटांना लगेचच भाजपची खुली ऑफर

रेखा यांचा कोरोना चाचणीस नकार; मुंबई महापालिकेच्या पथकाला दरवाजाही उघडला नाही

क्रूरतेचा कळस! चीनने गलवानमध्ये मृत सैनिकांचे बलिदान नाकारले; अंत्यसंस्कारास नकार

OnePlus Nord चे फिचर्स लीक; स्वस्त फोनमध्ये 6 कॅमेऱ्यांचा सेटअप आणि बरेच काही

सॅमसंगची फ्रिजवर ऑफर! 38 हजारांचा स्मार्टफोन मोफत; 9 हजारांचा कॅशबॅकही

शूट टू किल! एक गोळी दुश्मन खल्लास; जवानांना मिळणार खतरनाक अमेरिकी रायफल

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या