भारतीय स्टेट बँक (SBI) ची ऑनलाईन सेवा काही तांत्रिक कारणांमुळे गेल्या तासाभरापासून ठप्प झाली आहे. बँकेनेच ट्विट करत करोडो ग्राहकांना याची माहिती दिली आहे. या समस्येपासून एटीएम मशीन लांब आहेत.
बँकेने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही ग्राहकांना विनंती करत आहोत की त्यांनी आमच्यासोबत रहावे. लवकरच सामान्य सेवा पुन्हा सुरु केली जाईल. कनेक्टिव्हिटी नसल्याने आमच्या कोअर बँकिंग सेवा ग्राहकांना वापरता येणार नाहीत. एटीएम आणि पीओएस सुरळीत सुरु आहेत. उर्वरित सेवा बंद आहे, असे म्हटले आहे.
44 कोटी ग्राहक भारतीय स्टेट बँकेकडे जवळपास 44 कोटी ग्राहक आहेत. ही संख्या पाहता या ग्राहकांना त्रास होणार आहे. स्टेट बँक देशातील सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचा बाजारातील हिस्सा 25 टक्के एवढा मोठा आहे. तसेच या बँकेची देशभरात जवलपास 24 हजार शाखा आहेत. एटीएमची संख्याही काही लाखांत आहे. नुकतेच स्टेट बँकेच्या अध्यक्षपदी दिनेश खारा यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पदभार स्वीकारताना ग्राहकाभीमूख सेवा आणि सुरक्षा देणार असल्याचे म्हटले होते.
एटीएम आपल्या दारीएसबीआयने प्रायोगिक तत्वावर एटीएम आपल्या दारी ही योजना सुरु केली आहे. यानुसार ग्राहकांना एटीएम मधून पैसे काढायचे असल्यास एक कॉल किंवा व्हॉस्टऐपवर मेसेज केल्यास एसबीआयचे फिरते एटीएम घरी येणार आहे. यासाठी एसबीआयने 7052911911, 7760529264 हे दोन नंबर जारी केले आहेत.