नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्या(सीएए)संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 144 याचिका दाखल करण्यात आल्या असून, सर्वोच्च न्यायालयानं आज त्याच्यावर सुनावणी घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान नागरिकत्व सुधारणा कायद्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्यास नकार दिला आहे. सीएएसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या 144 याचिकांवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश देण्यास नकार दिला आहे.तसेच सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवून चार आठवड्यात उत्तर देण्यास सांगितलं आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती अब्दुल नजीर आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं नागरिकत्व सुधारणा कायद्यासंबंधित 144 याचिकांवर सुनावणी घेतली.
CAAवर तात्काळ प्रतिबंध घालण्यास SCचा नकार, केंद्राला पाठवली नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:57 AM