शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

एससी-एसटी विधेयक राज्यसभेत संमत

By admin | Published: December 22, 2015 2:47 AM

दहा दिवसांच्या खोळंब्यानंतर राज्यसभेने सोमवारी महत्त्वपूर्ण अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक एकमताने संमत करण्याची तत्परता दाखविली

नवी दिल्ली : दहा दिवसांच्या खोळंब्यानंतर राज्यसभेने सोमवारी महत्त्वपूर्ण अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) सुधारणा विधेयक एकमताने संमत करण्याची तत्परता दाखविली. २०१५-१६ च्या अनुदान मागण्यांसंबंधी दोन विधेयकांनाही सभागृहाने अवघ्या काही मिनिटांत मंजुरी दिली.राज्यसभेने विनियोग (नं ४) आणि विनियोग (नं.५) ही दोन्ही विधेयके अनुदान मागण्यांच्या दुसऱ्या संचासह लोकसभेकडे परत पाठविली आहेत. २०१५-१६ च्या सरकारी खर्चाची पूर्तता करता यावी यासाठी ते क्रमप्राप्त होते. सर्वपक्षीय बैठकीत ठरल्याप्रमाणे आम्हाला अनुसूचित जाती-जमाती विधेयक संमत करायचे असताना सत्ताधारी पक्षाने आजच्या अजेंड्यावर नसलेले विधेयक आणत हा मुद्दा गुंतागुंतीचा बनविला आहे. आम्हाला बालगुन्हेगार न्याय विधेयकावरही चर्चा करायची आहे; मात्र ते आजच्या अजेंड्यावर नाही. केवळ बातम्यांचा आधार घेत सरकारने पुरवणी अजेंड्याच्या मार्गाने हे विधेयक समोर आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. उद्या काँग्रेसनेच हे विधेयक रोखल्याचा ठपका ठेवला जाईल, असा आरोप विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केला. त्यावर सभापती पी.जे. कुरियन यांनी हे विधेयक चर्चेसाठी घेतले. त्यानंतर चर्चा न होताच ते आवाजी मतदानाने संमत झाले. सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)