भोपाळ- मध्य प्रदेशमधल्या धार जिल्ह्यात पोलीस कॉन्स्टेबल भरतीदरम्यान विद्यार्थ्यांनी चक्क छातीवर जात कोरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी मी SC, मी ST असं छातीवर लिहिल्याचं आरोग्य तपासणीदरम्यान उघड झालं आहे. यानंतर या प्रकाराला जोरदार विरोध होऊ लागला आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगा(NHRC)नं मध्य प्रदेश सरकारला नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे.तर अल्फाबेट रुग्णालयात कोणत्या तरी अधिका-यानं या विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिल्याची शक्यता धारच्या सीएमएचओ डॉ. आरसी पनिका यांनी व्यक्त केली आहे. त्या अधिका-यांनी कोणाच्या सांगण्यावरून विद्यार्थ्यांच्या छातीवर जात लिहिली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीएमएचओनं याचा तपास डॉ. केसी शुक्ला आणि डॉ. एस पटेल यांच्याकडे सोपवला आहे. प्राथमिक चौकशीत दीपक नावाच्या एका अधिका-यानं हा प्रकार केल्याचं उघड झालं आहे.
मी SC, मी ST...विद्यार्थ्यांनी छातीवर कोरली जात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2018 6:32 PM