शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

संसदेच्या दोन्ही सभागृहात हक्कभंग प्रस्तावांचा गदारोळ

By admin | Published: March 03, 2016 1:57 AM

काँग्रेस-भाजप यांच्यात जुंपली

काँग्रेस-भाजप यांच्यात जुंपली
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या उभय सभागृहात मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींच्या विरोधातील हक्कभंग प्रस्तावावरून बुधवारी काँग्रेस आणि भाजपमधे तुफान खडाजंगी झाली. काँग्रेस या प्रस्तावाबाबत मंगळवारपासून आग्रही आहे. प्रत्युत्तरादाखल भाजपने लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे तर राज्यसभेत जद (यु)च्या के.सी. त्यागींविरूध्द हक्कभंग प्रस्ताव दाखल करून या गदारोळात आणखी भर घातली आहे.
सभागृहात स्मृती इराणींवरील हक्कभंग प्रस्तावामुळे अडचणीत सापडलेल्या भाजपच्या मदतीला अण्णाद्रमुकचे सदस्य ठामपणे उभे राहिले आहेत. गेले दोन दिवस उभय सभागृहात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांची एअरसेल मॅक्सिस प्रकरणी चौकशी करण्याच्या मागणीवरून अद्रमुक सदस्यांनी तुफान गोंधळ घातला. बुधवारी राज्यसभेत या गोंधळामुळे शून्यप्रहराचे कामकाजही होउ शकले नाही. अण्णाद्रमुकचे नवनीतकृष्णन यांची मागणी फेटाळतांना उपसभापती कुरियन म्हणाले, सदर विषयासाठी उचित नोटीस दिल्याशिवाय हा विषय तुम्हाला सभागृहात मांडता येणार नाही. तरीही गदारोळ थांबला नाही अखेर राज्यसभेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करावे लागले.
राज्यसभेत गुजराथच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेलांच्या कन्या अनार पटेल व त्यांच्या भागीदारांना कवडीमोल किमतीत गीर अभयारण्याजवळची जमीन ॲलॉट करण्याचा मुद्दा, काँग्रेसचे प्रमोद तिवारी मांडू इच्छित होते मात्र सभागृहातील गदारोळामुळे त्यांना तो मांडता आला नाही. लोकसभेत इशरत जहां प्रकरणावरून भाजपच्या सदस्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू म्हणाले, सुरूवातीला लष्करची वेबसाईट, त्यानंतर डेव्हिड हेडलीचे निवेदन आणि आता अंतर्गत सुरक्षेचे माजी गृहसचिव यांचा खळबळजनक खुलासा यामुळे संसदेत इशरत जहां प्रकरणी चर्चा झाली पाहिजे, असे मला वाटते. भाजपच्या भूपेंद्र यादवांनी याच मुद्यावर राज्यसभेत लक्षवेधी सुचना दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मात्र इशरत प्रकरणी चिदंबरम यांचा बचाव केला आहे. त्या म्हणाल्या, चिदंबरम पूर्वीच म्हणाले होते की इशरत प्रकरणी सत्ताधार्‍यांतर्फे आपल्यावर जाणीवपूर्वक हल्ला चढवला जाईल. आज तेच घडते आहे. अशाप्रकारे लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात तर राज्यसभेत शून्यप्रहरात विविध विषयांवर उभय पक्षांनी घोषणाबाजी करीत परस्परांवर शरसंधान केले. लोकसभेतल्या घोषणाबाजीमुळे अध्यक्षा सुमित्रा महाजन बर्‍याच व्यथित झाल्या होत्या. लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे सौगत राय,सुदिप बंदोपाध्याय आदींनी काँग्रेसची पाठराखण केल्यानंतर गटनेते खरगेंना हक्कभंग प्रस्तावाचे प्रास्ताविक अध्यक्षांनी करू दिले.