सूरत- गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे. या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सूरतहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली. या अपघातात आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर 20हून अधिक विद्यार्थी गंभीर जखमी आहेत.बसमध्ये पहिलीपासून आठवी इयत्तेपर्यंतचे जवळपास 67 विद्यार्थी होते. अमरोली स्थित ट्युशन सेंटर गुरुकृपामध्ये शिक्षणारे विद्यार्थी शनिवारी पिकनिकसाठी गेले होते. ही मुलं अमरोली आणि छापराभाठा भागातील होती. शबरीधाम, पंपा सरोवर आणि महाल कॅम्प पाहिल्यानंतर या मुलांना पुन्हा घरी नेलं जातं होतं. संध्याकाळी 6 वाजता डांगच्या महाल-बर्डीपाडा घाटात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस 200 फूट खोल दरीत कोसळली, या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
पिकनिकवरून परतताना बस 200 फूट दरीत कोसळली, 10 विद्यार्थ्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 7:20 AM
गुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला..
ठळक मुद्देगुजरातच्या सूरतहून शनिवारी संध्याकाळी पिकनिकवरून परतताना विद्यार्थ्यांच्या स्कूल बसला अपघात झाला या अपघातात 10 विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सूरतहून परतताना महाराष्ट्रालगतच्या डांग जिल्ह्यातील बर्डीपाडा गावाजवळच्या दरीत ही बस कोसळली.