अहमदाबाद - हल्ली जिकडे तिकडे देशभक्तीचे वारे वाहू लागले आहेत. भावी पिढीत जन्मभूमी, कर्मभूमीचे संस्कार आणि देशभक्तीचे बाळकडू सुरुवातीपासूनच रुजावेत म्हणून निरनिराळ्या पद्धतीनं उपक्रम राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी गुजरातमधीलशाळांमध्ये विद्यार्थ्यांना हजेरी लावताना येस सर/मॅडम किंवा प्रेझेंट सर/मॅडम म्हणण्याऐवजी आता 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलावे लागणार आहे. देशभक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि गुजरात माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (GSHSEB) यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेत सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीतील विद्यार्थ्यांना 'जय हिंद' अथवा 'जय भारत' बोलून हजेरी लावावी लागणार आहे. सरकारी शाळा, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळांना या अधिसूचनेचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. 1 जानेवारी 2019पासून या अधिसूचनेच पालन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
(शाळा झाल्या डिजिटल, विद्यार्थी झाले तंत्रस्नेही; शिक्षण विभागाची माहिती)
मुला-मुलींमध्ये लहानपणापासूनच देशभक्ती रुजावी, या उद्देशानं संबंधित निर्णय घेण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात सोमवारी (31 डिसेंबर) झालेल्या आढावा बैठकीत राज्य शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुदासमा यांनी हा निर्णय घेतला.
(नको शाळा, नको पाटी : होम स्कूलिंगची पहाट)
विद्यार्थ्यांना मारहाणदरम्यान, काही दिवसांपूर्वी शाळेच्या मुख्याध्यापकांनी कथित स्वरुपात विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचे वृत्त समोर आले होते. इस्लामिक पद्धतीने अभिवादन न करता गुड मॉर्निंग म्हटल्यानं मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, अशी माहिती समोर आली होती. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील शाहजहापूर येथील आहे. मुख्याध्यापक चांद मियाँ यांना जेव्हा आम्ही विद्यार्थी गुड मॉर्निंग म्हणत असू, तेव्हा ते आम्हाला 'अस्सलाम वालेकुम' म्हणण्याची सक्ती करायचे, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी तपास अधिकाऱ्यांकडे केली होती. या प्रकरणाच्या तपासणीदरम्यान मुख्याध्यापक दोषी आढळल्यानं त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.