नाशिक : शासनाचे शिक्षण धोरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत शिक्षण बचाव समितीने दिलेल्या दोन दिवसीय शाळा बंदला जिल्ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ातील निम्म्याहून अधिक शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव जाणवला नाही. आता गुरुवारी प्रतिसाद मिळावा, यासाठी बचाव समितीच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.अनुदान पात्र शाळांना अनुदान नाही, विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा रखडलेला प्रश्न, शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रोजी रोटीवर गंडांतर आणणारा आकृतिबंध रद्द करावा, अशा राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी एकत्र येऊन शिक्षण बचाव समितीच्या वतीने गेल्या महिनाभरापासून आंदोलने करण्यात येत असून, बुधवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस शाळा बंदची राज्यस्तरावर हाक देण्यात आली होती. नाशिकमध्ये या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाला. जिल्ात मोठ्या संख्येने शाळा असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था, तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीसह अनेक संस्थाचालकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. परंतु प्रत्यक्ष सहभाग मात्र घेतला नाही. व्ही. एन. नाईक एज्युकेशन सोसायटी आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या दोन संस्थांच्या शाळा मात्र बंद होत्या. अनेक संस्थाचालकांनी मागण्या रास्त असल्या तरी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यामुळे या शाळा सुरू होत्या.शिक्षण बचाव समितीचे नाशिकचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड यांनी मात्र जिल्ातील ७० टक्के शाळा बंद होत्या. मंगळवारी सायंकाळी शाळा बंदचा निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांपर्यंत निरोप पोहोचते झाले नाही, त्यामुळे उर्वरित शाळा सुरूच होत्या, असा दावा केला. अशा होत्या शाळा बंदअनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित अशा एकूण ९३१ शाळांपैकी ४०९ शाळा बंद होत्या. यात अनुदानित २७५, विनाअनुदानित ९५, कायम विनाअनुदानित ३९ शाळांचा समावेश आहे. उच्च माध्यमिक ३२५ शाळांपैकी १७ शाळा बंद होत्या, तर २९० प्राथमिक शाळा असून त्यापैकी अवघ्या ३१ शाळा बंद होत्या.
शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद मागण्यांना केवळ पाठिंबा : बहुतांशी संस्था सुरूच
By admin | Published: December 09, 2015 11:54 PM