शाळा-महाविद्यालय जोड....
By admin | Published: September 10, 2015 4:46 PM
परांजपे स्कूल
परांजपे स्कूलबाल मंदिर संस्थेतर्फे संचालित परांजपे स्कूल नर्सरी, के. जी. च्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांना झाडांचे संगोपन, महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी फलक हातात घेऊन जनजागृती केली. यशस्वितेसाठी मुख्याध्यापिका भावना खरे आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले.विमलताई तिडके कॉन्व्हेंटअत्रे ले आऊट येथील विमलताई तिडके कॉन्व्हेंटमध्ये राष्ट्रगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध देशांचे राष्ट्रगीत सादर केले. पूर्व प्राथमिक आणि प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी विविध राष्ट्रीय झेंड्यांचे कोलाज सादर केले. गायिका डॉ. निशा कुळकर्णी, सुनील देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. कार्यक्रमाला शाळेच्या संचालक आभा मेघे, प्राचार्य, पर्यवेक्षिका आणि शिक्षिका उपस्थित होत्या.शीलादेवी पब्लिक स्कूल (फोटो-०२पीएचओ१८)शीलादेवी पब्लिक स्कूलतर्फे नर्सरी तथा प्रि-प्रायमरीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना फळ आणि फूल दाखवून त्याबाबत माहिती देण्यात आली. यामुळे हसत खेळत विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. कार्यक्रमाला आराधना शुक्ला, अंजली तिवारी, शाळेचे संचालक एल. सी. गर्ग, मुख्याध्यापिका पूजा उपस्थित होत्या.