वाढीव शुल्कावरून शाळा-पालकात जुंपली अरेरावी : पत्रकारांना शिक्षकांची धक्काबुक्की
By admin | Published: August 13, 2015 11:24 PM
लातूर : शहरातील बंकटलाल विद्यालयात ड्रेस व पाठ्यापुस्तके शाळेतूनच घ्यावी अशी सक्ती केली होती़ त्यातच विद्यालयाने वाढीव दराने शैक्षणिक साहित्य वाटप कलेअसल्याचा आरोप पालकानी केेला़ यामुळे शालेय प्रशासन व पालकात चांगलीच जुंपली़ या घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या दोन पत्रकारांना शाळेतील एका शिक्षकाने धक्का बुक्कीकरत बाहेर काढले़
लातूर : शहरातील बंकटलाल विद्यालयात ड्रेस व पाठ्यापुस्तके शाळेतूनच घ्यावी अशी सक्ती केली होती़ त्यातच विद्यालयाने वाढीव दराने शैक्षणिक साहित्य वाटप कलेअसल्याचा आरोप पालकानी केेला़ यामुळे शालेय प्रशासन व पालकात चांगलीच जुंपली़ या घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या दोन पत्रकारांना शाळेतील एका शिक्षकाने धक्का बुक्कीकरत बाहेर काढले़गुरूवारी झालेल्या या नाट्यमय घडामोडीनंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने माफीमागुन या प्रकरणावर पडदा टाकला़लातूर शहारातील बंकटलाल लाहोटी प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शैक्षणिक साहित्य व गणवेश वाढीव दरात विद्यार्थ्यांना देण्यात आल्याने पालकात संताप व्यक्त होत होता़ त्यामुळे गुरूवारी काही पालक शाळेत जमले त्यांन शाळा व्यवस्थापानाला या प्रकरणी जाब विचारला असता, पालक व शळा व्यवस्थापनात बाचा बाची झाली़ या घटनेची माहिती घेण्यासाठी आलेल्या माध्यमाच्या नितिन बनसोडे व सचिन अंकुलगे यांना थेथील एका शिक्षकाने अरेरावी ची भाष व धक्क बुक्कीकरत शाळेच्या बाहेर काढले़ हा प्रकार शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षान समजताच त्यांनी माफीमागुन या प्रकरणावर पडदा टाकला असला तरी गुरूवारी शिक्षण मंत्री लातूरत असल्याने पालकांच्या शिष्टमंडळाने त्यांना ही निवेदन दिले आहे़