नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनलॉक-3 साठी गाईडलाइंस जारी केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केल्या या गाईडलाइंसनुसार कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत कडक लॉकडाऊन राहणार असल्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशमधील प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर देशातील शाळा आणि महाविद्यालये 31 ऑगस्टपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
देशातील लॉकडाऊन हळू हळू कमी करण्यात येत आहे. मात्र, कंटेनमेंट झोनमध्ये अद्यापही कडक लॉकडाऊन सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. देशांतर्गत वैयक्तिक प्रवासाला विनापरवाना परवानगी देण्यात आली आहे. तर, 5 ऑगस्टपासून जीम व योगासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच, वैयक्तिक प्रवासासाठी सरकारने नाइट कर्फ्यूही हटवला आहे. मात्र, चित्रपटगृहे, मनोरंजन सभागृह, शाळा, महाविद्यालये बंदच राहणार आहेत.