शाळांमध्ये गुरूपौर्णिमा उत्साहात
By admin | Published: August 01, 2015 12:01 AM
सोलापूर : गुरूपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध शाळा, प्रशाला आणि महाविद्यालयांत मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले.
सोलापूर : गुरूपौर्णिमेनिमित्त शहरातील विविध शाळा, प्रशाला आणि महाविद्यालयांत मोठ्या उत्साहात कार्यक्रम घेण्यात आले. ज.रा. चंडक प्रशालामहाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळे येथील ज.रा. चंडक प्रशालेत गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा, माजी आमदार निर्मला ठोकळ, संभाजी मोरेे, पर्यवेक्षक उदय जाधव आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी अंजली काशीद, प्रगती सुतार, श्रेया माशाळ, स्वाती राठोड, नितीन सोमवंशी, सुहासिनी गवळी, कृष्णा गवळी, भावना बेविनकी, पद्मावती पुजारी, सायली कदम, ऋतुजा शिंदे आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन उज्वला रोकडे यांनी केले तर आभार विजय लांडगे यांनी मानले. ओंकार मराठी प्रशालाओंकार मराठी प्राथमिक प्रशाला, कुमठा नाका येथे गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी संस्थापक अध्यक्ष अविनाश गुरव, सदस्या लक्ष्मीबाई क्षीरसागर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. बत्तुल विद्यालय आदर्शमाता व्यंकम्माबाई बत्तुल माध्यमिक विद्यालयामध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद बत्तुल, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी इयत्ता ८ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयास रोप व कुंडी भेट दिली. दमाणी विद्या मंदिर दमाणी विद्या मंदिर, सोलापूर येथे गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता ४ थीतील विद्यार्थी अलोक कांबळे याची निवड करण्यात आली. या निवडीचे सूचक निष्ठा वाडकर तर अनुमोदन कीर्ती भराडिया यांनी दिले. यावेळी मुख्याध्यापिका निर्मला भोसले, शिक्षिका शीतल बंडगर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शीतल बंडगर यांनी केले. आभार मनीषा बावचकर यांनी मानले. फोटो ओळ : दमाणी विद्या मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या गुरूपौर्णिमा कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांसमवेत मुख्याध्यापिका निर्मला भोसले, शिक्षिका शीतल बंडगर आदी शिक्षक. बत्तुल प्राथमिक शाळा कुंभारी येथील गोदुताई परूळेकर विडी घरकूल वसाहतीतील बत्तुल प्राथमिक शाळा व म्हेत्रे प्रशालेच्या संयुक्त विद्यमाने गुरूपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी पी.के. चिवडशेी, मुख्याध्यापक बी.बी. घोडके, बी.डी. उमाप, रूक्मिणी शिंदे, स्वाती म्याकल, शुभांगी गटकळ आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना गुलाब, पुष्पगुच्छ, पेन व पेढे देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अश्विनी देसाई यांनी केले तर आभार भाग्यश्री साबळे यांनी मानले. एस.व्ही.सी.एस. अध्यापक विद्यालय एमआयडीसी भागातील श्री बृहन्मठ होटगी शिक्षण संस्था संचलित एसव्हीसीएस अध्यापक विद्यालयात गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य लक्ष्मण तेलुणगी, प्रा. राम ढाले, प्रा. हरिहर मोरे, प्रा. लक्ष्मी पाटील, प्रा. धनंजय नकाते, प्रा. अमोल वाघमारे, प्रा. सुहास मुदगल, प्रा. सुधा थंबद, प्रा. कविता बबलाद, आनंद पाटणे, भारत पाटील उपस्थित होते. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. उज्ज्वला महाजन, विद्या भापकर, प्रा. निलावती खरात यांनी प्रास्ताविक केले. नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडनॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड जिल्हा शाखा सोलापूर संचलित ममता मूकबधिर विद्यालयात गुरूपौर्णिमा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी माजी प्राध्यापक अशोक जडे, प्रभारी मुख्याध्यापक व्ही.एम. म्हेत्रे, शिक्षिका एम.ए. शिंगाडे, एम.एस. जोशी, एस.एस. गायकवाड, एस.आर. कळसे, उज्ज्वला पराळे आदी उपस्थित होते. संत तुकडोजी महाराज मागास समाजसेवा मंडळ संचलित श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक आश्रमशाळा नेहरूनगर येथे गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक बी.एस. बिळुरे, प्रा. डॉ. संघप्रकाश दुड्डे, बी.एस. पाटील, ए.एम. चव्हाण, यु.एस. यळसंगी, एस.जे. सांगोलकर, तृप्ती पवार, प्रणाली पाटील आदी उपस्थित होते. सेवासदन प्रशाला सेवासदन प्रशालेत गुरूपौर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्याध्यापिका विदुला बादरायणी, संस्थेच्या सचिवा सविता लळीत, शैलजा खांडेकर, हिराबाई बडोदेकर, रूपाली काळे आदी उपस्थित होते.