श्रीनगर : श्रीनगर शहरातील ९00 पैकी १९0 प्राथमिक शाळा सोमवारी सुरू झाल्या आणि मोठ्या प्रमाणात शिक्षकही कामावर आले, पण शाळांमध्ये विद्यार्थी मात्र खूपच कमी होते. माध्यमिक शाळा शुक्रवारी सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला, तरी महाविद्यालये कधी सुरू होणार, हे निश्चित नाही. खोºयातील २७ हजार टेलिफोन सुरू झाले आहेत. मात्र, जम्मूमधील इंटरनेट सेवा पुन्हा बंद केली आहे.गेले दोन दिवस खोºयात हिंसक निदर्शने झाल्याने, मुलांना शाळेत पाठविण्यास पालक घाबरत आहेत. जम्मू व आसपासच्या जिल्ह्यांतील शाळा १0 आॅगस्टपासून सुरू आहेत.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुपारी खोºयातील स्थितीचा आढावा घेतला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जम्मू-काश्मीरचा ११ दिवसांचा दौरा केला. त्यांनी तेथील परिस्थितीची माहिती त्यावेळी दिली. केंद्रीय गृहसचिव राजीव गौबा हेही बैठकीला उपस्थित होते.बारामुल्ला, पहलगाम, पट्टण, सिंगपुरा व सोपोरमधील निर्बंध शिथिल न केल्याने तेथील शाळा सुरू झाल्या नाहीत. जिल्ह्यांतील शाळा सुरू झाल्याचा दावा प्रशासनानेकेला. (वृत्तसंस्था)
काश्मीर खोऱ्यामधील शाळा सुरू; पण विद्यार्थ्यांची मात्र गैरहजेरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 6:22 AM