नवी दिल्ली : जगामध्ये असे आणखी भयंकर विषाणू आहेत, की ज्यांचा संसर्ग कोरोना विषाणूपेक्षाही भयानक असेल. त्या विषाणूंच्या साथी आफ्रिकेच्या उष्णकटिबंधीय वनक्षेत्रातून सुरू होऊन साऱ्या जगभर पसरण्याची शक्यता आहे, असा इशारा इबोला विषाणूचा शोध लावणारे शास्त्रज्ञ प्रा. जीन-जेकस मुयेम्बे टॅम्फम यांनी दिला आहे.टॅम्फम यांनी १९७६ साली इबोला विषाणूचा शोध लावला होता. ब्रिटनमध्ये नुकताच कोरोनाचा नवा विषाणू आढळून आल्याने जगभर पुन्हा घबराट निर्माण झाली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांच्या वाहतुकीला स्थगिती दिली आहे.प्रा. टॅम्फम यांनी म्हटले आहे की, आपण अशा जगात राहात आहोत जिथे अनेक जीवघेण्या विषाणूंचे अस्तित्व आहे. इबोला विषाणूचा शोध लावल्यानंतर तशाच प्रकारचे घातक विषाणू शोधण्याच्या कार्याला टॅम्फम यांनी वाहून घेतले आहे. त्यांनी इबोलाबाबत केलेले संशोधन मानवजातीसाठी विलक्षण उपकारक ठरले.
कोरोनापेक्षा भयंकर विषाणूंच्या भविष्यात साथी, इबोला शोधणाऱ्या शास्त्रज्ञाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 2:13 AM