लेह (लडाख) : जेथे सजीवसृष्टीला तग धरून टिकून राहणोही मुश्कील होते अशा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वाढणा:या एका वनौषधीमध्ये अनेक चमत्कारी औषधी गुणधर्म असल्याचे भारतीय वैज्ञानिकांना आढळून आले आहे. ही वनस्पती मानवी शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणोला नियंत्रित करू शकते, अति उंचावरील विरळ हवामानाशी जुळवून घेण्यास मदत करते एवढेच नव्हे तर किरणोत्साराच्या घातक परिणामांपासूनही संरक्षण देते, असे प्रयोगांती दिसून आल्याचा वैज्ञानिकांचा दावा आहे.
वनस्पतीशास्त्रत ‘:होडिओला’ या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती थंड आणि डोंगराळ वातावरणात आढळून येते. या वनौषधीत दिसून आलेले नानाविध औषधी गुणधर्ण पाहता बाणांनी विद्ध होऊन मुच्र्छितावस्थेत पडलेल्या लक्ष्मणाला नवजीवन देणारी रामायणात उल्लेखलेली ‘संजीवनी’ हीच तर नसावी ना, असा काहीसा समज वैज्ञानिकांमध्ये निर्माण झाला आहे.
स्थानिक लडाखी नागरिक जिला ‘सोलो’ या नावाने ओळखतात त्या ‘:होडिओला’चे बहुसंख्य औषधी गुणधर्म आजवर अज्ञात होते. या वनस्पतीच्या पानांचे स्थानिक लोक पालेभाजी म्हणून सेवनही करतात. पण भारतीय लष्कराच्या लेह येथील ‘डिफेन्स इन्स्टिटय़ूट ऑफ हाय ऑल्टिटय़ूड रीसर्च’ (डीआयएचएआर) या संशोधन संस्थेत तिच्या औषधी गुणधर्माचे विविध गुणोविशेष शोधले जात आहेत. त्यावरून 5,4क्क् मीटर उंचीवरील सियाचीन हिमनगासारख्या अत्यंत खडतर व अतिउंचावरील ठिकाणी तैनात असलेल्या सैनिकांना ही वनोषधी वरदान ठरू शकेल, असे वैज्ञानिकांना वाटते.
उपयरुक्त संस्थेचे संचालक आर. बी. श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘:होडिओला’ ही चमत्कारी वनस्पती असून तिच्यात रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे, खडतर वातावरणाशी जुळवून घेण्यास मदत करणारे व किरणोत्सर्गाचा प्रतिकार करणारे गुणधर्म आढळून आले आहेत. जैविक अस्त्रंच्या वापरामुळे होणा:या गॅमा किरणोत्साराचे दुष्परिणाम ती कमी करते असेही श्रीवास्तव म्हणाले. अतिउंचीवरील विरळ प्राणवायूच्या वातावरणात टिकून राहण्यासाठी ही वनस्पती वरदान ठरू शकते. (वृत्तसंस्था)
4‘:होडिओला’ ही वनस्पती ‘:होडेओला रोसिआ’ व ‘:होडेओला हिटरोडोन्टा’ या दोन उप-प्रजातींमध्ये आढळते. त्यांना अनुक्रमे पिवळ्या व जांभळ्या चमकदार रंगाची फुले येतात.
4पारंपरिक चिनी चिकित्सा पद्धतीत या वनौषधीचा वापर अतिउंचीमुळे होणा:या त्रसावर केला जातो.
4मंगोलियातील डॉक्टर याचा उपयोग क्षयरोग व कर्करोगावरील उपचारासाठी करतात.
रशियातील संशोधकांनी आणि खेळाडू व नंतर अंतराळवीरांच्या औषधयोजनेत या वनस्पतीचा वापर केला. इतर ठिकाणी केलेल्या संशोधनानंतर या वनौषधीचा वापर अतिश्रमानंतर लवकर उत्साहवर्धनासाठी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी व हृदयावरील ताण कमी करण्यासाठी केला गेलेला आहे.