शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
म्हैसूर-दरभंगा एक्स्प्रेसची मालगाडीला धडक; ट्रेनच्या डब्यांनी घेतला पेट
3
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
4
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
5
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
6
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
7
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
8
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
9
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
10
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
11
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
12
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
13
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
14
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
15
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
16
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
17
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
18
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
19
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
20
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!

SCO Meet 2022: भारत-पाक चर्चा पुन्हा सुरू होणार? नरेंद्र मोदी आणि शहबाज शरीफ पुढच्या महिन्यात भेटू शकतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2022 3:54 PM

SCO Meet 2022: पुढच्या महिन्यात उझबेकिस्तानमध्ये SCO बैठक होणार आहे, यात व्लादिमीर पुतिन आणि शी जिनपिंगदेखील येणार आहेत.

PM Modi to Meet Shehbaz Sharif: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची पुढील महिन्यात भेट होऊ शकते. पुढच्या महिन्यात 15-16 सप्टेंबर रोजी उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये शांघाई कॉरपोरेशन ऑर्गेनायझेशन(SCO) शिखर परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत शरीफ आणि मोदींची भेट होण्याची शक्यता आहे. 

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ सहभागी होणार असून दोघे भेटू शकतात, असे मानले जात आहे. पण, या बैठकीत नेमके कोणते मुद्दे असणार, दोन्ही देशांमध्ये पुन्हा चर्चा सुरू होणार का? याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये एकही औपचारिक बैठक झालेली नाही.

शी जिनपिंग आणि पुतिन यांचीही भेट होऊ शकतेरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे समरकंदमधील याच बैठकीत सहभागी होणार आहेत. दोघे आले तर या दोन नेत्यांचीही भेट होऊ शकते. रशिया-युक्रेन युद्धानंतर पुतिन यांची आणि गलवान व्हॅलीच्या घटनेनंतर शी जिनपिंग यांची पंतप्रधान मोदींनी भेट घेतलेली नाही.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPakistanपाकिस्तान