या वर्षी पाकिस्तानात एससीओची बैठक होणार आहे. ही बैठक इस्लामाबादमध्ये 15-16 ऑक्टोबररोजी होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी निमंत्रण दिले आहे. मात्र पंतप्रधान मोदी तेथे जाण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर जाणार की आणखी कोणी? हे अद्याप स्पष्ट जालेले नाही.
तत्पूर्वी, तीन-चार जुलैला कझाकिस्तानमध्ये एससीओ समिट झाली होती. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाग घेतला नव्हता. त्यावेळी त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. महत्वाचे म्हणजे, नरेंद्र मोदी 2015 मध्ये पाकिस्तानात गेले होते. त्यानंतर ते कधीही पाकिस्तानात गेले नाहीत.
भारत सरकारने अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही -टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भारत सरकारने अद्याप सीएचजी बैठकीसाठी एससीओ प्रोटोकॉलनुसार देण्यात आलेल्या निमंत्रणावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही. जम्मूमध्ये झालेले दहशतवादी हल्ले पाकिस्तानात कुठल्याही उच्च-स्तरीय मंत्री-स्तरीय यात्रेविरोधात काम करतील. एवढेच नाही तर, गेल्या महिन्यात महीने आपल्या कारगिल विजय दिनाच्या संदेशात पीएम मोदी यांनी पाकिस्तानचे नाव घेत त्याने इतिहासातून काहीही शिकले नाही. अशात तो दहशतवाद आणि प्रॉक्सीवारच्या माध्यमाने कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत आहे, असे म्हटले होते.
खरे तर, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचे यजमानपद सर्व सदस्य देशांकडे दिले जाते. यावेळी हे यजमानपद पाकिस्तानकडे आले आहे. यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी पीएम मोदींना निमंत्रण पाठवले आहे.