किंगदावो (चीन) - शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेन शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडे रवाना झाले आहेत. दहशतवादी नेटवर्कविरुद्ध देशांनी आणि जागतिक पातळीवर एकत्रित कारवाई करावी, अशी भूमिका यावेळी भारत मांडेल. चीनचं प्राबल्य असलेल्या या गटाचा भारत गेल्या वर्षी पूर्ण सदस्य बनला. आपल्या या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत शनिवारी चर्चा करण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 8:18 AM