PM Modi Uzbekistan Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उझबेकिस्तानला रवाना झाले आहेत. उझबेकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांच्या निमंत्रणावरून नरेंद्र मोदी समरकंदमध्ये(Samarkand) होणाऱ्या शांघाय शिखर परिषदेत(SCO) सहभागी होतील. समरकंदला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी गुरुवारी एक निवेदनही जारी केले. यामध्ये पंतप्रधान म्हणाले की, ते सध्याच्या समस्या, विस्तार आणि सहकार्याबाबत विचारांची देवाणघेवाण करण्यास उत्सुक आहेत.
पंतप्रधान मोदी शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे नेते इब्राहिम रायसी यांच्यासह इतर नेत्यांसह SCO च्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी उझबेकिस्तानचे राष्ट्रपती शवकत मिर्जियोयेव यांच्या निमंत्रणावर जात आहेत. यंदा उझबेकिस्तानमध्ये SCO आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवारी 16 सप्टेंबर रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता SCO सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक होणार आहे. पंतप्रधान मोदींचा समरकंद दौरा 24 तासांपेक्षा कमी असेल. PM मोदी उद्या रात्री 10:15 वाजता म्हणजेच 17 सप्टेंबरच्या वाढदिवसापूर्वी दिल्लीला परततील.
काय म्हणाले पीएम मोदी?PM मोदींनी रवाना होण्यापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटले की, "SCO समिटमध्ये मी सध्याच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण, SCO चा विस्तार आणि संघटनेतील बहुआयामी आणि परस्पर फायदेशीर सहकार्य आणखी वाढवण्याची अपेक्षा करतो. व्यापार, अर्थव्यवस्था, संस्कृती आणि पर्यटन क्षेत्रात परस्पर सहकार्यासाठी उझबेक राष्ट्राध्यक्षांच्या काळात अनेक निर्णय घेतले जाण्याची अपेक्षा आहे."