नवी दिल्ली : स्कॉर्पिन पाणबुडीसंबंधीची माहिती फुटण्याकडे खूपच गांभीर्याने बघितले जात असले तरी त्याबाबत खूप काळजी करावी असे काही नाही, असे नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लान्बा यांनी म्हटले. ती २२ हजारपेक्षाही जास्त पानांची माहिती फुटल्यानंतर लान्बा हे सोमवारी त्या विषयावर प्रथमच बोलले. पाणबुडीच्या क्षमतेची माहिती व अन्य तपशील त्यात आहे. कोणत्याही स्वरुपाची माहिती फुटणे हे गांभार्यानेच बघितले जाते. स्कॉर्पिन पाणबुडीच्या फुटलेल्या माहितीचा विषय आम्ही खूप गांभीर्याने घेतला आहे आणि आम्ही फ्रेंच कंपनी डीसीएनएसला तिने तातडीने या प्रकरणी चौकशी करावी असे सांगितले, असेही लांबा म्हणाले.लान्बा म्हणाले,‘‘ संरक्षण मंत्रालयाने या फुटीची चौकशी करण्यासाठी उच्च पातळीवरील समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या अहवालानुसार कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे ते बघू.’’ (लोकमत न्यूज नेटवर्क)
स्कॉर्पिन प्रकरण गंभीरच!
By admin | Published: August 30, 2016 4:39 AM