हैदराबाद : तेलंगाना बारावी बोर्डाच्या च्या निकालांवरून राज्य सरकारविरोधात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांमध्येच झटापट झाली. कोणत्यातरी मुद्द्यावरून झालेल्या मतभेदांचा पर्यावसान काँग्रसचे वरिष्ठ नेते हनुमंथा राव आणि नागेश मुदिराज यांच्यातील हाणामारीमध्ये झाले.
तेलंगाना बोर्डाचे निकाल 18 एप्रिलला लागले होते. यानंतर बोर्डावरच अफरातफर केल्याचे आरोप झाले. यामुळे पालकांनीही मोठ्या प्रमाणावर नाराजी जाहीर केली होती. निकालापासूनच राज्य सरकारविरोधात आंदोलने केली जात आहेत. विरोधी पक्षांनीही हा मुद्दा लावून धरत आंदोलनामध्ये उडी घेतली आहे. तसेच टीबीआयआय बोर्डाविरोधात निकालांमध्ये अफरातफर केल्याचा आरोप लावला आहे. या काळात राज्य सरकारने नापास झालेल्या तीन लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे पेपर पुन्हा तपासण्याचे आदेश दिले आहेत. यंदाच्या परिक्षेला 9.74 लाख विद्यार्थी बसले होते. यापेकी 3.28 लाख विद्यार्थी नापास झाले आहेत. पहिल्या वर्षी 59.5 आणि दुसऱ्या वर्षात 65 टक्के विद्यार्थी पास झाले होते.
निकालानंतर अनेक विद्यार्थ्यांनी निराश होऊन आत्महत्या केली होती. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. एका आठवड्यात 19 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. ही संख्या गेल्या काही वर्षांतील जास्त आहे. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तातडीची बैठक बोलावली होती. ज्यामध्ये शिक्षण विभागाचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.