नवी दिल्ली- बिहारमध्ये पुन्हा एकदा वंदे मातरमवरून वाद निर्माण झाला आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनी एका प्राथमिक शाळेत ध्वजारोहणावेळी वंदे मातरम गाणं न गायल्यानं मोठा वादंग झालं आहे. प्राथमिक विद्यालयाचा शिक्षक अफझल हुसैननं 26 जानेवारीला वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला.याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांनी त्या शिक्षकावर हल्लाबोल केला. त्या शिक्षकाची स्थानिकांनी यथेच्छ धुलाई केली. शिक्षक अफझल हुसैन म्हणाला, मी वंदे मातरम गायलं नाही. कारण ते आमच्या धर्माच्या विरोधात आहे. आम्ही अल्लाहची प्रार्थना करतो आणि वंदे मातरम म्हणणं म्हणजे भारताची वंदना, जी आमच्या धर्माच्या विरोधात आहे. संविधानातही हे गाणं अनिवार्य नाही. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वंदे मातरम् म्हणणं संविधानात अनिवार्य नाही; मुस्लिम शिक्षकाच्या दाव्यानंतर शाळेत राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 9:19 AM