नवी दिल्ली - दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरातच पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे. पार्किंगवरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, यादरम्यान पोलिसांच्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. तसेच गोळीबार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एक वकील जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 4:59 PM