बंगळुरू -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या क्यार चक्रिवादळामुळे सध्या पश्चिम किनारपट्टीवर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. दरम्यान, येत्या २४ तासांमध्ये या चक्रिवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. क्यार चक्रिवादळाचा प्रभाव कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनारपट्टीवर दिसून येणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तटरक्षक दलाने अलर्ट जारी करत बचाव कार्याच्या तयारीला वेग दिला आहे. तसेच समुद्रात अडकलेल्या मच्छिमारांना वाचवण्याचे काम सुरू आहे. क्यार चक्रिवादळाबाबत माहिती देताना हवामान खात्याने सांगितले की, ''पुढच्या २४ तासांत अरबी समुद्रात क्यारचा प्रभाव वाढेल. याचा परिणाम किनारी भागांमध्ये दिसून येईल. त्यामुळे कर्नाटच्या काही भागात पाऊस आणि वादळाची शक्यता आहे. तसेच हे वाळक चक्रिवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे, मात्र नंतर हे चक्रिवादळ ओमानच्या किनाऱ्याच्या दिशेने जाईल.''
पुढच्या २४ तासांत क्यारची तीव्रता वाढणार, कोकण किनारपट्टीवर सावधानतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 8:35 PM