ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 13 - जम्मू काश्मीर येथे हिमालय पर्वत रांगांमध्ये अमराथ पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. श्रीनगर पासून साधारणपणे 135 किमी वर समुद्रसपाटी पासून 13600 फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. त्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो- लाखो भाविक येथे भेट देतात. अमरनाथ गुहेबद्दल तुम्हाला एक प्रश्न अवश्य पडत असेल की, एवढ्या उंचीवर स्थित असलेल्या गुहेत सर्वात पहिले कोण पोहोचल असेल आणि गुहेतील महादेवाचे या रूपातील दर्शन कोणी घेतले? अमरनाथ या गुहेच्या शोधाविषयी असेही सांगितले जाते की, या गुहेचा शोध एका मुस्लिम व्यक्तीने लावला. या व्यक्तीचे नाव बुटा मलिक असे होते. 1850 मध्ये मलिक यांना सर्वात प्रथम या शिवलिंगाचे दर्शन झाले. मलिक गुरे चारण्याचे काम करत होता. मलिकच्या कुटुंबातील लोक आजही अमरनाथ गुहेची देखभाल करतात.आणखी वाचा -
मुस्लिम व्यक्तीनं लावला होता अमरनाथ गुहेचा शोध
By admin | Published: July 13, 2017 3:57 PM
तुम्हाला एक प्रश्न अवश्य पडत असेल की, एवढ्या उंचीवर स्थित असलेल्या गुहेत सर्वात पहिले कोण पोहोचल असेल आणि गुहेतील महादेवाचे या रूपातील दर्शन कोणी घेतले?
अमराथ गुहेसंदर्भात ज्या कथा प्रचलित आहे त्यानुसार, असे मानले जाते की, गुरे चारण्याचे काम करणारा बुटा मलिक करत असे. यावेळी तो आपली जनावरे घेवून खूप दूर निघून गेला. या बर्फाळ प्रदेशात त्याला एक साधू भेटले. त्या साधूने बुटा मलिकला कोळशाने भरलेली एक शेगडी दिली. घरी आल्यानंतर बुटाला त्या शेगडीमध्ये कोळशाच्या ठिकाणी सोने दिसले. हा चमत्कार पाहून तो चकित झाला आणि साधूचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा त्याच ठिकाणी गेला. परंतु त्याला तेथे साधू भेटले नाहीत तर एक मोठी गुहा दिसली. गुहेत प्रवेश केल्यानंतर त्याने पाहिले की, महादेव बर्फापासून तयार झालेल्या शिवलिंग रुपात स्थापित होते. त्यानंतर त्याने ही घटना गावातील लोकांना सांगितली आणि त्यानंतर हा प्रसंग तत्कालीन राजाच्या दरबारात पोहोचला. त्यानंतर काळाच्या ओघात या ठिकाणचे महत्त्व वाढतच गेले आणि हे एक तीर्थस्थळ बनले.