मुंबई - देशातील इंधन दरवाढ सर्वसामान्य नागरिकांसाठी नेहमीच त्रासदायक आणि आर्थिक बजेट कोलमडणारी ठरत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी आहे. हैदराबादमधील एका व्यक्तीने वॉटर फ्युअल इंजिन बनवलंय. सुंदर रमैय्या नावाच्या व्यक्तीने हा भन्नाट शोध लावला आहे. सुंदर यांच्या दाव्यानुसार हे इंजिन वापरल्यास कुठलिही गाडी 1 लिटर पाण्यामध्ये 30 किमीपर्यंत रस्त्यावर धावेल.
आपल्या इंजिन शोधाबाबत सांगताना रमैय्याने म्हटले की, या इंजिनाच्या वापराने केवळ पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीपासून सुटका मिळणार आहे. तर, इंधनापासून होणाऱ्या प्रदुषणालाही आळा घालण्यात येईल. सुंदर यांनी एका वॉटर फ्युअल टेक्नॉलॉजीचा शोध लावला आहे. त्यामुळे पाण्यावर दुचाकी आणि चारचाकी वाहन धावणार आहे. या इंजिनामुळे पर्यावरणाला कुठलिही हानी पोहोचणार नसून यातून ऑक्सीजन बाहेर पडेल, असा दावाही सुंदर यांनी केलाय. तसेच, 1 लिटर पाण्यामध्ये 30 किमीपर्यंतचा प्रवास वाहनातून करता येईल, असेही सुंदर यांनी सांगितलंय.