नवी दिल्ली : व्यवहारात अनियमितता केल्याप्रकरणी सेबीने नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच एनएसईला अकराशे कोटी रुपयांचा दंडठोठावला आहे. एनएसईने संगणकीय सर्व्हर प्रणालीचा गैरवापर करून दलालांना लाभ पोहोचविल्याचा ठपका ठेवत सेबीने ही कारवाई केली आहे. तर सेबीने दिलेल्या या आदेशामुळे एनएसईच्या कामकाजावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. कारण सेबीने एनएसई हा एक मान्यताप्राप्त शेअर बाजार आहे, असे स्पष्टीकरण एनएसईकडून बुधवारी देण्यात आले.
सेबीच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये दाखल एका तक्रारीनंतर एनएसईची सह-स्थान (को-लोकेशन)ची सुविधा तपासण्यात आली. या तपासात टिक बाय टिक (टीबीटी) डेटा रूपरेषेच्या संबंधित नियमांचे अपेक्षित पालन झाले नसल्याचे आढळले आहे. टीबीटी डेटा फीड ऑर्डर बुकसंदर्भात सर्व माहिती देतो. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’चे संचालक जी. महालिंगम यांनी मंगळवारी दिलेल्या १०४ पानी आदेशात या घोटाळ्यावरील चौकशी तडीस नेली आहे. सेबीने केलेल्या या कारवाईत एनएसईचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण हे दोषी आढळले असून, या दोघांना कोणत्याही सूचीबद्ध कंपनी किंवा बाजार पायाभूत संस्थेशी व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे.
अन्य १६ जणही दोषीया प्रकरणात अन्य १६ जणांनाही दोषी ठरविण्यात आले आहे. या दोघांनाही संबंधित कालावधीतील वेतनाच्या २५ टक्के रक्कम येत्या दीड महिन्यात दंडाच्या स्वरूपात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘सेबी’च्या या आदेशानंतर तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य ती पावले उचलली जाणार असल्याचे एनएसईने स्पष्ट केले आहे.
सह-स्थान (को-लोकेशन) म्हणजे काय?को-लोकेशनमुळे त्याचा फायदा घेणाऱ्या ब्रोकरला सर्व्हरच्या अधिक जवळून काम करणे शक्य होते. या सुविधेमुळे त्याचा वापर करणाºया ब्रोकरला कमी वेळेत डाटा ट्रान्समिशनचा लाभ मिळतो. त्यामुळे संबंधित ब्रोकरच्या एक्सचेंज आॅर्डर इतरांच्या तुलनेत कमी वेळेत सर्व्हरमध्ये नोंद केल्या जातात. त्यामुळे इतर ब्रोकरच्या तुलनेत त्यांना आघाडी मिळते.