शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

‘सेबी’ प्रमुखांनी बँकेचाही पगार घेतला,नियुक्तीबाबत पंतप्रधानांनी स्पष्टीकरण द्यावे, काँग्रेसची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 6:30 AM

Madhavi Buch: शेअर बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी बुच यांनी निर्णय घेताना वैयक्तिक स्वारस्य जपले, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य असताना बुच यांनी आयसीआयसीआय बँकेचे नियमित वेतनही घेतले आणि ही रक्कम १६.८० कोटींच्या घरात जाते, असा दावाही काँग्रेसने केला आहे. 

 नवी दिल्ली - शेअर बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्ष माधवी बुच यांनी निर्णय घेताना वैयक्तिक स्वारस्य जपले, असा आरोप काँग्रेसने सोमवारी केला. ‘सेबी’च्या पूर्णवेळ सदस्य असताना बुच यांनी आयसीआयसीआय बँकेचे नियमित वेतनही घेतले आणि ही रक्कम १६.८० कोटींच्या घरात जाते, असा दावाही काँग्रेसने केला आहे. 

मंत्रिमंडळ नियुक्ती समितीचे अध्यक्ष या नात्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुच यांच्या नियुक्तीबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही काँग्रेसने येथील पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. प्रसिद्धी विभागाचे प्रमुख पवन खेडा म्हणाले की, बुच या ५ एप्रिल २०१७ ते ४ ऑक्टोबर २०२१ पर्यंत सेबीच्या पूर्णवेळ सदस्य होत्या, तसेच २ मार्च २०२२ पासून अध्यक्ष झाल्या. असे असतानाही त्या आयसीआय बँकेकडून नियमित वेतन घेत होत्या, जे १६.८० कोटींच्या घरात जाते. हे सरळसरळ सेबीच्या कलम ५४ चे उल्लंघन आहे. त्यामुळे त्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा दिला पाहिजे.

आयसीआयसीआय बँक म्हणते, वेतन दिले नाही- बुच यांनी निर्णय घेताना वैयक्तिक हित जपल्याची अनेक उदाहरणे पुढे आली आहेत.- २०२१-२०२३ दरम्यान त्यांना ईएसओपीवर टीडीएसही मिळाला होता आणि त्याची भरपाई आयसीआयसीआय बँकेने १.१० कोटी एवढी केली होती.- टीडीएसची रक्कम वेतनांतर्गत घेतली जाते आणि येथेही सेबीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले आहे, असे खेडा म्हणाले.- दरम्यान, आयसीआयसीआय बँकेने म्हटले की, सेवानिवृत्तीनंतर बूच यांना कोणतेही वेतन अथवा ईएसओपी देण्यात आलेले नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसSEBIसेबीCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी