'आप'ची विधानसभेसाठी दुसरी यादी जाहीर, कुणाला उमेदवारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 12:31 PM2024-09-10T12:31:54+5:302024-09-10T12:32:44+5:30
AAP Haryana Election 2024 : काँग्रेससोबत बोलणी फिस्कटल्यानंतर आम आदमी पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी मंगळवारी जाहीर केली.
AAP Candidates For Haryana Assembly 2024 : हरियाणा विधानसभा निवडणूक एकत्र लढण्याबद्दल काँग्रेससोबतची बोलणी फिस्कटल्यानंतर आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिला आहे. आपने दुसरी यादीही जाहीर केली आहे. ९ जणांची नावे जाहीर करण्यात आली असून, आतापर्यंत आपने २९ उमेदवार जाहीर केले आहेत.
लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला चांगले यश मिळाले. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि आप एकत्र लढण्याची शक्यता होती. दोन्ही पक्षांमध्ये बोलणीही सुरू होती. पण, आपची जागांची मागणी आणि काँग्रेसची देण्याची तयारी नसल्याने ही आघाडी फिस्कटली.
आपची दुसरी यादी, कुणाला दिली उमेदवारी?
आम आदमी पार्टीने दुसऱ्या यादीत ९ जणांच्या नावांची घोषणा केली आहे. पहिल्या यादी २० उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या यादीतच आपने काँग्रेसविरोधात उमेदवार दिल्याने ही आघाडी तुटल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले होते.
दुसऱ्या यादीत सधौरा मतदारसंघातून रीता बामनिया, थानेसर मतदारसंघातून कृष्ण बजाज, इंद्री मतदारसंघातून हवा सिंह, रतिया मतदारसंघातून मुख्तियार सिंह बाजीगर, आदमपूर मतदारसंघातून भूपेंद्र बेनिवाल, बारवाला मतदारसंघातून छतर पाल सिंह, बावल मतदारसंघातून जवाहर लाल, फरिदाबाद मतदारसंघातून प्रवेश मेहता आणि टिगोन मतदारसंघातून अबास चंदेला यांना तिकीट देण्यात आले आहे.
#WATCH हरियाणा चुनाव | AAP ने 9 उम्मीदवारों की अपनी दूसरी सूची जारी की। pic.twitter.com/UcjTAChuBb
— ANI_HindiNews (@AHindinews) September 10, 2024
पहिल्या यादीत कोणाच्या नावांचा समावेश?
उचाना कला मतदारसंघातून पवन फौजी, मेहममधून विकास नेहरा, बादशाहपूरमध्ये बीर सिंह सरपंच, नारायगडमधून गुरपाल सिंह, समालखामधून बिट्टू पहेलवान, दाबवली मतदारसंघातून कुलदीप गदराना, रोहतकमधून बिजेंद्र हुड्डा, बहादूरगढमधून कुलदीप चिकारा, बादली विधानसभा मतदारसंघातून रणबीर गुलिया, बेरी मतदारसंघात सोनू अहलावत आणि महेंद्रगढ मतदारसंघातून मनीष यादव यांना आपने उमेदवारी दिली आहे.